शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये आर्थिक मदत द्यावी ― संभाजी ब्रिगेडची मागणी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
सतत पडणा-या पावसामुळे केज आणि परळी विधानसभा मतदारसंघात पेरणीपासूनच सोयाबीनचे प्लॉट हे पाण्यात आहेत.पाण्यात भिजल्याने या शेंगांना कोंब फुटू लागले आहेत.तर सोयाबीन,मुगाच्या
पेरणीपासूनच संकट लागले असून शेंगा काळवंडल्या आहेत. पाऊस अजूनही पाठ सोडायला तयार नाही. शेतक-यांना बोगस बियाणे मिळाले.कधी पेरलेले बियाणे बोगस निघाले.सोयाबीन न उगवल्याने अनेक शेतक-यांचे दुहेरी नुकसान झाले. पावसामुळे शेतात जाता येईना.त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले.अगोदरच परिणामी उभ्या पिकांची मोठी नासाडी होऊ लागली आहे. डोंगराळ भागात बाजरी पिक धोक्यात आले आहे.त्यामुळे
केज आणि परळी विधानसभा मतदारसंघातील पिकांचे पंचनामे करून शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रूपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे
यांनी केले आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने केलेल्या आवाहनानुसार यावर्षी वेळेवर पाऊस पडला पण,नुकसान होत आहे.जास्त पावसाने शेतीत पाण्याचे डोह साचले आहेत.पिके
काढणीची कामे लांबली असून यामुळे शेतमजुरांना आर्थिक फटका बसला आहे.काढणीस आलेल्या पिकांत मुग व सोयाबीनच्या शेंगा जागेवर फुटून नव्याने उगवत आहेत. सोयाबीन जागेवर पिवळे पडत आहे. उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस,बाजरी जागेवरच आडवी होत असून उत्पन्नावर परीणाम होत आहे.शेतात साचलेल्या पाण्याने परिणाम होणार आहे. बाजरी व कापसाचे पीक धोक्यात आले आहे.काढणीस आलेल्या पिकांची नासाडी होवून परळी तालुक्यात पिकांचे 80 टक्क्यांवर नुकसान होवून जादा पावसामुळे ऊसाचे वादळी वारे आणि पाण्यामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक गेले आहे.तर गोदाकाठच्या भागात पूर आल्याने या परिसरातील झालेला खर्चही निघतो की,नाही अशी स्थिती आहे.शेतात पाणीच पाणी झाल्याने पिके वाहून गेली,हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.केज आणि परळी विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत.शेतक-यांची मानसिक आणि आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.खरीप पिकांचे 80 टक्के एवढे नुकसान झाले आहे.यावर्षी काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने केज आणि परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई,परळी,केज या 3 तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस,ऊस,बाजरी आणि कांदा या पिकांचे पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रूपये आर्थिक मदत करून न्याय द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी केली आहे.

*मराठा तरूणांनो आत्महत्या करू नका*
=================
विवेक कल्याण रहाडे
(वय-18,रा.केतुरा,जि.बीड) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना दुर्दैवी आहे.शेतकरी कुटुंबातील विवेक बारावी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता.विवेक हा
शेतकरी कुटुंबातील होता.त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते.वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट ही परीक्षा दिली होती.आरक्षणास स्थगिती मिळाल्याने विवेक हताश झाला होता.मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केली असून मृत्युपूर्वी त्याने तशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवली आहे.रहाडे परिवाराच्या दु:खात संभाजी ब्रिगेड सहभागी आहे.त्यामुळे मराठा तरूणांनो कृपा करून आपले आयुष्य असे संपवू नका.मराठा तरूणांच्या मृत्यूनंतर राज्य आणि केंद्र सरकार यांना जाग येईल असे समजने चुकीचे आहे.हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे आणि महासचिव सौरभदादा खेडेकर यांचे मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून लढा देत राहू.

-प्रविण ठोंबरे (जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,बीड.)

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.