अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
उत्तरप्रदेशच्या हाथरस मधील सामुहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पिडीतेचा मंगळवारी दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालयात मृत्यू झाला या प्रकरणी देशभरात संताप व्यक्त होत आहे.पिडीत कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खा.राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांना धक्काबुक्की करून अटक करण्यात आली.सदर घटनेच्या निषेधार्थ बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार,दि.1 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथील सावरकर चौकात फलक झळकावून निषेध करण्यात आला.यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्दशने केली.
उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये मनिषा वाल्मिकी या मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर देशभर असंतोषाचं वातावरण आहे.या प्रकरणावरून काँग्रेस पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारला जाब विचारून कोंडीत पकडले आहे.हाथरस प्रकरणावरून खा.सोनियाजी गांधी यांनी भाजपा सरकारला जाब विचारल्यानंतर काँग्रेस नेते खा.राहुलजी गांधी आणि प्रियांकाजी गांधी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसकडे रवाना झाले होते.दरम्यान हाथरसकडे रवाना झाले होते.दरम्यान त्यांना रोखून उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुलजी गांधी यांना धक्काबुक्की केल्याची माहिती माध्यमांमध्ये येत आहे.खा.राहुलजी गांधी हे नोएडामार्गे हाथरसकडे रवाना झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला.त्यानंतर राहुलजी गांधी हे चालतच हाथरसच्या दिशेने निघाले होते.उत्तरप्रदेश पोलीसांनी हाथरस प्रकरणात केवळ बघ्याची भूमिका घेतली.पिडीत कुटुंबाला भेट देण्यासाठी निघालेल्या खा.राहुलजी गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करून अटक करण्यात आली.याचे संतप्त पडसाद काँग्रेस कार्यकर्त्यातून उमटत आहेत.बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सदर घटनेचा निषेध नोंदवून गुरूवार,दि. 1 ऑक्टोंबर रोजी अंबाजोगाईतील सावरकर चौक येथे निर्दशने करण्यात आली.यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व उत्तरप्रदेश सरकार विरोधात घोषणा दिल्या.या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,तालुकाध्यक्ष औंदुंबर मोरे,शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,माणिक वडवणकर, राणा चव्हाण,दिनेश घोडके,अशोक देवकर,चंद्रकांत महामुनी,शेख मुक्तार, सचिन जाधव,अजिम झरकर,अजय रापतवार,सुशिल जोशी,भारत जोगदंड, अमोल मिसाळ,प्रताप देवकर,रफिक गवळी,शेख अनिस, शेख खलील,सुधाकर टेकाळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.
*हाथरस येथील घटनेचा व गांधी यांच्या अटकेचा जाहिर निषेध..!*
=================
काँग्रेस नेते खा.राहुलजी गांधी यांना धक्काबुक्की करून हाथरसकडे पायी जाताना पोलिसांनी रोखलं हा प्रकार निषेधार्य आहे.उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील एका गावात मनिषा वाल्मिकी या 19 वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला.सदर मुलीचा उपचारा दरम्यान दिल्ली येथील सफदरजंग रूग्णालयात मृत्यू झाला.मृत्यू झाल्यानंतर सदर मयत पिडीतेच्या कुटुंबास कुठलीही माहिती न होवू देता परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले.हा प्रकार निषेधार्य असून सदर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे व पिडीतेला न्याय द्यावा अन्यथा या प्रश्नी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष बीड जिल्ह्यात आंदोलन करेल.
*- राजकिशोर मोदी (जिल्हाध्यक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,बीड)*