अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

हाथरस घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध ; नराधमांना कठोर शिक्षा करा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) अंबाजोगाई तालुका कमिटीच्या वतीने उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अमानवी अत्याचाराचा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला.बलात्काराची बळी असलेली दलित युवती व तिच्या कुटुंबाला भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारने निर्लज्जपणे न्याय नाकारण्याच्या कृत्याचाही यावेळी धिक्कार केला.हाथरस घटनेत सरकारच्या निष्ठूरतेमुळेच पीडितेचा बळी गेला आहे अशी प्रतिक्रिया कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी व्यक्त केली.

14 सप्टेंबर रोजी चार उच्चवर्णीय पुरूषांनी केलेल्या पाशवी बलात्कारात मनिषा वाल्मिकी हिला भयंकर गंभीर दुखापती झाल्या होत्या.बलात्कार करणा-यांनी तिची जीभ कापून टाकली होती.तिला प्रचंड रक्तस्त्राव होत होता.परंतु,पोलिसांनी पाच दिवसांपर्यंत तिची तक्रार नोंदवून घ्यायलाच नकार दिला.तिला ताबडतोब वैद्यकीय मदत मिळाली असती तर तिचा जीव वाचला असता पण,ती देखील नाकारली गेली.जातीयवादी क्रूरतेची परिसीमा म्हणजे,तिच्यावर रीतसर अंत्यसंस्कार करण्याचा हक्क तिच्या कुटुंबियांना नाकारत पोलिसांनी तिच्या मृत शरिराचे परस्पर दहन ही केले.हा जातीयवादी बलात्काराचा रानटी गुन्हा म्हणजे उत्तर प्रदेशातील भाजपची कायद्याला पूर्णपणे धाब्यावर बसवणारी सत्ता आणि जातीयवादी व प्रतिगामी शक्तींना दिले जाणारे अभय यामुळे दलित व स्त्रियांवर प्रचंड प्रमाणात वाढलेल्या अत्याचारांचे प्रतिबिंबच आहे.नुकत्याच आलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या अहवालामधून देखील याची पुष्ठी होत आहे.उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये मनिषा वाल्मिकी या मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर देशभर असंतोषाचं वातावरण आहे.या प्रकरणावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारला जाब विचारून कोंडीत पकडले आहे.संपूर्ण महाराष्ट्रभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भाजपा सरकारला जाब विचारत सदरील घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत.अंबाजोगाई तालुका कमिटीच्या वतीने कमिटीच्या वतीने सदर घटनेचा निषेध नोंदवून शुक्रवार,दिनांक 2 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाईतील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली.यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व उत्तरप्रदेश सरकार विरोधात घोषणा दिल्या.या प्रसंगी माकपचे ज्येष्ठ नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे,सुहास चंदनशिव,देविदास जाधव,प्रशांत मस्के, विनोद शिंदे,धिरज वाघमारे,राम गायकवाड,अमोल धोत्रे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

*हाथरस प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करून पिडीतेला न्याय द्या*
==================
उत्तरप्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील एका गावात मनिषा वाल्मिकी या 19 वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला.सदर मुलीचा उपचारा दरम्यान दिल्ली येथील सफदरजंग रूग्णालयात मृत्यू झाला.मृत्यू झाल्यानंतर सदर मयत पिडीतेच्या कुटुंबास कुठलीही माहिती न होवू देता परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले.हा प्रकार निषेधार्य असून सदर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे व पिडीतेला न्याय द्यावा.
*-कॉ.बब्रुवाहन पोटभरे*
(माकप.जिल्हा कमिटी सदस्य.)


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.