अंबाजोगाईत काँग्रेसने केला शेतकरी विधेयकांचा विरोध ;धरणे आंदोलन करून पाळला किसान मजदुर बचाव दिवस

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहिर केल्याप्रमाणे अंबाजोगाईत धरणे आंदोलन करून शुक्रवार,दि.2 ऑक्टोंबर रोजी किसान मजदूर बचाव दिवस पाळण्यात आला.जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अंबाजोगाईत भाजपा प्रणित केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या कृषी विधेयकांचा विविध घोषणा लिहीलेले फलक झळकावून विरोध दर्शवला.

येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुका काँग्रेस कमिटीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त किसान मजदूर बचाव दिवस पाळला.प्रारंभी दोन्ही महापुरूषांना अंबाजोगाई काँग्रेसने अभिवादन केले.यावेळी केंद्र शासनाने शेतकरी विरोधी मंजुर केलेले.कृषी विधेयक तात्काळ मागे घ्यावे या मागणीचे निवेदन देशाचे राष्ट्रपती यांना उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत देण्यात आले.उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोविड-19 चे सर्व नियम पाळून धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज लखेरा,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,तालुकाध्यक्ष औंदुबर मोरे,शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे,राणा चव्हाण,माणिक वडवणकर,डॉ.राजेश इंगोले,गणेश मसने, सुनिल वाघाळकर, शेख मुक्तार,दिनेश घोडके,अकबर पठाण,उमेश शिंदे, पांडुरंग देशमुख,गणेश कुकडे,अनिसखाँ पठाण,रणजित हारे,योगेश देशमुख,बालासाहेब इंगळे,चंद्रकांत गायकवाड,शंकर शिनगारे,चंद्रकांत महामुनी,महेबुब गवळी,महेश वेदपाठक,अजय रापतवार,अशोक देवकर,शेख मुक्तार, सचिन जाधव,भारत जोगदंड,प्रताप देवकर,अमोल मिसाळ,आमेर खतीब,मुनीर शहा, रियाज पठाण,चेतन परदेशी,श्रीकृष्ण डिडवाणी,राहुल लोमटे,अजय ठाकुर, शेख सलमान,शेख अलीम,शेख इस्माईल,नानासाहेब मुळे,अमोल दोडके, दिनेश सुरवसे,अशोक थोरात,संतोष वाघाळकर,नरसिंग साबणे,शंकर गवळी, व्यंकटेश पोतदार, अजय पवार,विलास व्यवहारे,आदीनाथ लाड,अमोल दहिभाते,अ‍ॅड.अनिल लोमटे,सचिन अंजान, सुधाकर टेकाळे, परमेश्‍वर वाकडे,प्रताप देशमुख,विजय कोंबडे,रवि कलशेट्टी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.