पाटोदा (शेख महेशर) दि.१०: पाटोदा येथे ह.भ.प.रामकृष्ण रंधवे (बापू )महाराज यांच्या शुभ हस्ते S. A. रेडीमेड चा भव्य शुभारंभ करण्यात आला. या वेळी ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापू यांनी बोलताना सांगितले की चिकाटीने व्यवसायात प्रगती होते , विनम्र सेवा , तोंडात साखर , डोक्यावर बर्फ असल्यास व्यवसायात यश नक्की मिळते. या वेळी दुकानाचे मालक मेडकर म्हणाले की आम्ही ग्राहकांसाठी ब्रँडेड सर्व कंपन्यांची रेडीमेड कपड्याची होलसेल दरात विक्री सुरू केली असुन , गुढीपाडव्यापर्यंत पंधरा टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे. तरी सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. हे रेडीमेड पाटोदा येथे बस स्टँड रोड लक्ष्मी स्वीट होम च्या वरील मजल्यावर सुरू करण्यात आले आहे. या मेडकर बंधू पाचेगावकर यांच्या S.A. रेडीमेड कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटन सोहळा साठी या वेळी बाबासाहेब शिंदे महाराज , बबनराव जाधव , नामदेवराव जाधव , हरिभाऊ म्हस्के , अंकुशराव भोसले , नवनाथ साळुंके (अध्यक्ष संताजी युवक मंडळ ) अशोक माकूडे , सचिन दाताळ , पञकार दत्ता देशमाने ( संयोजक माणुसकीची भिंत )रमेश गिरे सरपंच पाचगाव ,श्रीराम गिरे , प्रदीप गिरे, यांच्या सह बहुसंख्य नागरिक व हितचिंतक उपस्थित होते.
0