अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कै.शंकरराव गुट्टे वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ताराचंद होळंबे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा.नारायणराव चाटे हे उपस्थित होते.प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर प्राचार्य डॉ.ताराचंद होळंबे आणि माजी प्राचार्य प्रा.नारायणराव चाटे यांनी दोन्ही महापुरूषांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंग्रजी विभागप्रमुख प्रा.पांडुरंग मामडगे तर प्रास्ताविक प्रा.डॉ.जितेंद्र कोकणे यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.मदनलाल नरवाडे यांनी मानले. सदर कार्यक्रमास सर्व विभागाचे विभागप्रमुख, सहप्राध्यापक, कर्मचारी वृंद उपस्थित होता.कोविड 19 चे पालन करून सदर कार्यक्रम घेण्यात आला अशी माहिती कै.शंकरराव गुट्टे वरिष्ठ महाविद्यालयाचे वाणिज्य विभागप्रमुख प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी दिली आहे.