अशोक देवकते―
धनगर आरक्षणावर ठाकरे सरकारने तत्काळ निर्णाय घ्यावी यासाठी सबंध महाराष्ट्रातील धनगर समाज संपूर्ण राज्यात एकाच दिवशी म्हणजे १६ ऑक्टोबर रोजी राज्यभर रास्ता रोको करण्याचा निर्णय आज रविवार ४ अॉक्टोबर रोजी दुपारी लोणावळा येथे झालेल्या बैठकीत धनगर आरक्षण लढा समन्वय समितीने जाहीर केला आहे. आज एका हॉल मध्ये १ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीसाठी मा. मंत्री अण्णासाहेब डांगे, मा आ. पोपटराव गावडे, मा. रामराव वडकुते. मा.आ. प्रकाश शेंडगे, मा. आ. रमेश शेंडगे, गणेश हाके, अर्जुन सलगर, उज्ज्वालाताई हाके, सक्षणा सलगर, नवनाथ पडळकर, नवनाथ ढगे, रामकृष्ण रौंदळे यांच्यासह राज्यातील अनेक संस्था संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी एकच आंदोलन व्हावे यासाठीच आग्रहाची भूमिका मांडली.