परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजरस्ते अपघात

परळी: धर्मापुरी जवळ अपघातात एक जण जागीच ठार

परळी:अशोक देवकते― भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटर सायकलच्या धडकेत मोटर-सायकलवरील तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात रविवारी संध्याकाळी परळी - धर्मापुरी रोडवर सारडगाव जवळ घडला विजय बनसोडे (वय ३२, रा.परळी असे त्या मृत तरुणाचे नाव आहे.

विजय आणि त्यांचा मित्र नितीन हे दोघे दुचाकीवरून धर्मापुरीकडे निघाले होते. ते सारडगाव जवळ आले असतांना समोरून भरधाव वेगाने परळीकडे जात असलेल्या ट्रकने (एमएच ११ एएल ७८८८) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विजय बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला तर नितीन गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला आहे पुढील तपास परळी ग्रामीण चे पोलीस करत आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.