ईस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले २.५ लाख रुपयांचे सोने-चांदी प्रामाणिकपणे केले परत

Last Updated by संपादक

वरठाणच्या तरुणाची पाचोऱ्यातील प्रामाणिकपणा

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― ईस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सोने चांदी सापडले परंतु आपल्याला कोणाचे सोने नको,घामाने कमवु तेच आपले यानुसार वरठाण ता.सोयगाव येथील पाचोऱ्यात इस्तरीचे दुकान असलेल्या तरुणाने ज्या ग्राहकांचे सोने होते त्यालाच वापस केले आजही जगामध्ये असे प्रामाणिक लोक आहेत त्यांचे हे जिवंत उदाहरण आहे त्याचा हा प्रामणिकपणा पाहुन त्यांचे सर्वत्रकडुन कौतुक केले जात आहे.

ही घटना पाचोरा,ठाकरेनगर येथे घडली असुन तो प्रामाणिक तरुण गणेश जाधव हा वरठाण (ता सोयगाव) येथील रहिवासी आहे.

सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील गणेश ओंकार जाधव (वय ४६) ह्या तरुणांचा ईस्तरी करण्याचा व्यवसाय असुन गेल्या विस वर्षांपासून हा व्यवसाय वरठाण येथे करीत होता परंतु खेड्या गावात पाहिजे तेवढा धंदा होत नसल्याने गणेशने गेल्या चार वर्षांपासून पाचोरा( जि.जळगाव) शहरात भाड्याने गाळा घेऊन ईस्तरीचा व्यवसाय सुरू केला तेथील स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दीवसाकाठी तीनशे कींवा चारशे रुपये मिळत होते त्यामधुन वरठाण ते पाचोरा अपडाऊन पन्नास रूपये खर्च होत असे अनेकवेळा कपड्यांमध्ये शंभर, दोनशे ,पाचशे रुपये सापडले असून त्याने ज्यांचे पैसे होते त्यांचे त्याने प्रामाणिकपणे वापस केल्याने तसेच गणेश एक डोळ्याने आधंळा असुन तेथील स्थानिक नागरिकांचा मदतीचा हात पुढे करीत गणेशला एक पत्र्याची टपरी बनवुन दीली त्याठिकाणी ईस्तरीचा व्यवसाय सुरळीत चालू आहे..

गेल्या चार दीवसापुर्वी एक ग्राहक गणेशकडे कपडे ईस्तरीकरीता टाकुन गेले होते दुसऱ्या दिवशी कपडे ईस्तरीकरण्यासाठी पिशवीतुन काढले असता एक पाकीट खाली पडले पाकीट खोलुन बघीतले असता त्यामध्ये सहा सोन्याच्या अंगठ्या,एक सोन्याची पोत, चांदीचे कडे,कमरेची चैन असा जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सोने चांदी होते गणेशच्या टपरीमध्ये अनेक ग्राहकाच्या कपड्याच्या पिशव्या ईस्तरीसाठी आलेल्या होत्या आता हे सोने कोणाचे हा प्रश्र्न त्याला पडला चार दीवसानतंर साहेबराव पाटील (तलाठी) रा.बिड हल्ली मु .ठाकरेनगर पाचोरा हे गणेशकडे येवुन विचारणा केली असता की आमची काही वस्तु कपड्याच्या पिशवीत आली का आमचे सोने घरात कुठेच सापडत नाही तेव्हा गणेशने सांगितले की ते सोने मला सापडले आहे.

वरठाण ला घरी ठेवलेले सोने चांदी सोमवारी साहेबराव पाटील यांच्या स्वाधीन केले. यावेळी धनराज पाटील, गणेश पाटील,भागवत पाटील,बढे सर,नाना पाटील,अणिल चित्ते व कॉलनीतील नागरीक उपस्थित होते

◆ सोशल मिडिया वर देखील कौतुक

गणेश जाधव कडे एक एकर जमिन असुन ती जमिन नदीकाठावर असल्याने गेल्या पंधरवड्यात वरठाण परीसरात मुसळधार पावसामुळे नद्याना मोठ्या प्रमाणात पुर आल्याने गणेशाच्या शेतातील कापुस पिक वाहुन मोठे नुकसान झाले आहे सद्या तो भाड्याच्या घरात राहत असुन देखील त्याला सापडलेले दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सोने चांदी प्रामाणिकपणे वापस केल्याने सोशल मिडिया वर देखील गणेशचे कौतुक केले जात आहे.

■ प्रामाणिकपानाचा सोयगाव तालुक्याचा शिक्कामोर्तब

वरठाण ता.सोयगाव येथील पाचोरयाला इस्तरीचा व्यवसाय करत असतांना तब्बल अडीच लाखाचे सोन्याचे दागिने संबंधिताला परत केल्यावरून सोयगाव तालुक्याचा प्रामाणिकपणा जळगाव जिल्ह्यात शिक्कामोर्तब झाला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.