बीड:आठवडा विशेष टीम―उत्तरप्रदेशातील हाथरसच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवार,दिनांक 5 ऑक्टोबर रोजी राज्यभरासह बीड येथे सत्याग्रह करण्यात आला.यावेळी बोलताना भाजपशासीत राज्यात महिला व मुली असुरक्षित आहेत असे राजकिशोर मोदी म्हणाले.
पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते.त्यानुसार बीड येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तीन तास सत्याग्रह धरणे आंदोलन करून अर्धा तास मौन पाळण्यात आले.यावेळी बोलताना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, उत्तरप्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली.पण,भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही.हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले.पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तरप्रदेश सरकारची मजल गेली आहे.भाजप शासीत राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत.’बेटी बचाओ’ चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणी मात्र मूग गिळून गप्प आहेत.काँग्रेस पक्ष उत्तरप्रदेशातील भाजपाच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आज सोमवारी राज्यासह बीड जिल्ह्यात सत्याग्रह करीत आहे.हाथरस प्रकरणाची प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुप्रीम कोर्टामार्फत करावी.हाथरसच्या जिल्हाधिका-याला निलंबित करावे.पीडितेचा मृतदेह पोलिसांनी परस्पर पेट्रोल टाकून का जाळला.? उत्तर प्रदेश प्रशासनाने वारंवार दिशाभूल का केली.? पीडित कुटुंबाला धमक्या का दिल्या ? आणि जाळण्यात आलेला मृतदेह पीडितेचाच होता यावर विश्वास कसा ठेवायचा ? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा पीडित कुटुंबाचा हक्क आहे आणि या प्रश्नांची उत्तरं योगी आदित्यनाथ सरकारला द्यावीच लागतील,असंही राजकिशोर मोदी म्हणाले.काँग्रेसच्या सत्याग्रह धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,रविंद्र दळवी,तालुका अध्यक्ष महादेव धांडे,सरचिटणीस राहुल साळवे,प्रदेश सचिव दादासाहेब मुंडे,सेवादल अध्यक्ष योगेश शिंदे,राजीव गांधी पंचायतराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,ओबीसी सेलचे वचिष्ट बडे,मागासवर्गीय सेलचे गोविंद साठे,बीड शहर अध्यक्ष इद्रिस हाश्मी,शहादेव हिंदोळे,जयप्रकाश आघाव,जकिर शेख, इम्तियाज कुरेशी, रमेश सोनवणे,सुंदर जाधव,चरणसिंग ठाकूर,खमर इनामदार,गणेश राऊत,राम गोले,इम्तियाज तांबोळी,जयदीप राऊत,विजय पिसाळ,मधुकर वारे, आजी,माजी पदाधिकारी व प्रतिनिधी,तालुका अध्यक्ष,शहर अध्यक्ष, सेवादल,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,एन.एस.यु.आय.,ओ.बी.सी सेल,अनु.जाती सेल, असंघटीत कामगार सेल,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.