अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

वाढत्या अन्याय अत्याचारांमुळे भारतीय लोकशाही धोक्यात-अॅड.अनंतराव जगतकर

हाथरस प्रकरणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे राष्ट्रपतींना निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
आंबेडकरी समुह, अल्पसंख्यांक,आदिवासी महिला,मुली आणि बांधवांवर वाढत्या अन्याय अत्याचारांमुळे भारतात लोकशाही धोक्यात आल्याची भीती डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष अॅड.अनंतराव जगतकर यांनी व्यक्त केली आहे.उत्तर प्रदेशातील हाथरस सामुहिक अत्याचार प्रकरणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीने अप्पर जिल्हाधिकारी यांचे मार्फत सोमवार,दिनांक 5 ऑक्टोबर रोजी देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  उत्तर प्रदेशातील हाथरस सामुहिक अत्याचार प्रकरणावर भाष्य करताना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष अॅड.अनंतराव जगतकर निवेदनात म्हणाले आहेत की,या प्रकरणी उत्तरप्रदेशचे पोलिस महासंचालक हे मनिषा वाल्मिकी हिच्यावर अत्याचार झालाच नाही.हे तपास करण्यापूर्वीच सांगतात.मग,अत्याचार करणारी ती चार मुले आपल्या आठ हातांची पालखी करून पिडीतेला काय राखी बांधायला घेवून गेले होते का.?,पिडीतेने स्वता:च आपली जीभ कापून घेतली होती का.?,राखीचे ओझे न पेलवल्याने पिडीतेच्या पाठीची हाडे मोडली की काय.?,उत्तरप्रदेश
  पोलिसांचा अहवाल हा बनावट (फॅब्रिकेटेड) आहे.पोलिस प्रशासनाने वाल्मिकी कुटुंबाची अनुमती न घेताच मध्यरात्री लपून-छपून परस्परच पिडीतेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार का केले.पिडीत मुलगी काय कोरोना रूग्ण होती का.?,असे सवाल उपस्थित करीत या संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि उत्तर प्रदेशात तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी तसेच पिडीतेच्या कुटुंबाला 5 कोटी रूपये आर्थिक मदत करून कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी अॅड.अनंतराव जगतकर यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडे
  केली आहे.या सोबतच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या सोबत पोलिसांनी केलेल्या दंडेलीने उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याचे सिद्ध झाले असून काँग्रेस नेत्यांसोबत उत्तर प्रदेशात झालेल्या गैरवर्तुणकीबद्दल बोलताना ते म्हणाले की,हाथरस मधील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ज्या पद्धतीने
  रोखण्यात आले.धक्काबुक्की झाली.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.ते पाहता उत्तरप्रदेशात लोकशाहीचे,कायद्याचे राज्य नसल्याचे स्पष्ट झाले.उत्तर प्रदेशात जंगलराज आहे,असे नेहमीच म्हटले जाते आणि आज काँग्रेस नेत्यांना रोखून सत्याचा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला,अत्याचार दडपण्याचा प्रयत्न झाला,सर्व कायदे-नियम धाब्यावर बसवण्यात आले.माणुसकीला हरताळ फासला गेला.ते पाहता उत्तर प्रदेशात खरोखरच जंगलराज आहे हे स्वतः तेथील राज्य सरकारनेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे असे अॅड.जगतकर पुढे म्हणाले की,एका तरूणीवर अत्याचार होतो.अमानुष हत्या होते.तिला वेळेवर उपचार मिळत नाहीत, पीडित कुटुंबाच्या तक्रारीची वेळेवर दखल घेतली जात नाही,शेवटी त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला.त्यामुळे हा सगळा प्रकार अतिशय क्रूर,अमानुष आणि संवेदनशून्य आहे.या घटनेबद्दल उत्तरप्रदेश सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच आहे अशी संतप्त प्रतिक्रिया अॅड.अनंतराव जगतकर यांनी व्यक्त केली आहे.अशा परिस्थितीत पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आणि तिथे नेमके काय घडले.याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला जात असतील तर त्यात काहीही गैर नव्हते.तरीही त्यांना का अडवले गेले.? या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पक्षाने दिले पाहिजे असे अॅड.जगतकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.निवेदनावर अॅड.अनंतराव जगतकर,प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,प्रा.संभाजीराव बनसोडे यांच्या स्वाक्ष-या आहेत.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.