सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पोषक हवामान आणि सततचा पावूस यामुळे मका पिकांची वाढ क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने सोयगाव तालुक्यात १४ फुटावर उंची गेलेल्या मका पिकांची कापणीची चिंता वाढली आहे.
५० वर्षांच्या खरीप हंगामात यंदा खरीप मका पिकांची उंची १२ ते १४ फुटावर गेल्याने माणसाच्या उंची पेक्षाही जास्ती मका पिके वाढलेली आहे.त्यामुळे या पिकांची कापणी कशी करावी याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे.सोयगाव तालुक्यात ४७६३ हेक्टर वर मक्याची लागवड करण्यात आली आहे.त्यापैकी अतिवृष्टी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे निम्म्या पेक्षा अधिक क्षेत्र पाण्यात बुडाले होते,परंतु पावसाच्घ्या उघडिपी नंतर मका पिकांची कापणी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असता,उंची १४ फुटावर असल्याने कापणी करावी कशी याचा अभ्यास शेतकऱ्यांना करण्याची वेळ आली आहे.यंदाच्या हंगामात मका पिकांसाठी पोषक हवामान आणि पुरेसा पावूस झाल्याने मका पिकांची उंची गगनाला भिडली असल्याच अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.मात्र कापणी करण्यासाठी यंदाचा मका शेतकऱ्यांना अडसर ठरला आहे.
उसा एवढी मक्याची उंची-
खरीप हंगामाच्या इतिहासात पहिल्यांदाच १४ फुटावर मका पिकांची उंची गेल्याचे पहावयास मिळाले असून उसा एवढी मक्याची उंची आढळून येत असल्याने सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कापणी करून मक्याच्या सोन्गणीचा मोठा प्रश्न पडला आहे.