अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

हाथरसचे सामुहिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाई करा ; काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
हाथरस येथील दलित समाजातील मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याप्रकरणी व काँग्रेस नेते खा.राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना उत्तरप्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोषींवर
कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक
संजय वाघमारे यांनी भारताचे राष्ट्रपती मा.रामनाथ कोविंद यांना सोमवार,दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक संजय वाघमारे यांनी
उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचे मार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,हाथरस येथील दलित समाजातील 19 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तीचे हाल करण्यात आले.या घटनेने संपुर्ण देश हादरलेला आहे.गुन्हेगार व योगी आदित्यनाथ सरकारने केलेल्या कृत्याने सर्वांना शरमेने मान खाली घालायला लावली आहे.सदरील मुलीला जिवंतपणी व मृत्युनंतर ही तिची अवहेलना करण्यात आलेली आहे.तसेच राजकीय नेत्यांना व मिडीयाला देखील भेटू दिले गेले नाही.व पिडीतीच्या कुटुंबाजवळ शेकडो पोलीस तैनात ठेवून पिडीताच्या कुटुंबास नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.तसेच काँग्रेस नेते खा.राहुल गांधी व प्रियंका गांधी हे पिडीतेच्या कुटुंबास भेटण्यासाठी गेले असता त्यांना उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की करत अत्यंत हीन पातळीवरचा व्यवहार करून त्यांना अटक करण्यात आली व काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला.योगी आदित्यनाथ सरकारच्या या मनमानी,असंवैधानिक कृत्यांचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे.संबंधित दोषींवर तात्काळ करावाई करून पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा असे नमूद केले आहे.सदरील निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक संजय वाघमारे,काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अॅड.अनंतराव जगतकर,काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष वसंतराव मोरे,माजी शहराध्यक्ष तारेखअली उस्मानी,माजी जिल्हा सरचिटणीस भगवानराव ढगे,ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब जाधव यांच्या स्वाक्ष-या आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.