अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘स्वाक्षरी मोहिम’ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीपासून राबविण्यात येत आहे.या मोहिमेत बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी असून.या मोहिमेला शेतकरी,शेतमजूर आणि कामगार वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.अंबाजोगाई येथे गुरूवार,दिनांक 8 ऑक्टोबर रोजी या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.
अंबाजोगाईतील सावरकर चौक परिसरात बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक आसेफोद्दीन खतीब,नगरसेवक सुनील व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण,कचरूलाल सारडा,सुनील वाघाळकर,दिनेश घोडके,शेख मुख्तार,जावेद गवळी,महेबूब गवळी,अजीम जरगर,मतीन जरगर हे उपस्थित होते.या मोहिमेतर्गंत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारने देशातील शेतकरी,शेतमजूर,आडती,कामगार,कर्मचारी यांच्या विरोधात जी तीन विधेयके आणली.ती मागे घ्यावीत अशी मागणी करणारे व्हिडीओ,फोटो,संदेश हे सोशल मिडीयावर म्हणजेच फेसबुक,ट्विटर, इन्टाग्राम,युट्युब यावर पोस्ट करून भाजपा प्रणित केंद्र सरकारचा जाहिर निषेध केला.या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होवून शेतक-यांच्या पाठीशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहिला.‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ ही ऑनलाईन मोहिम,2 ऑक्टोबर रोजी काँग्रेस ‘किसान मजदूर बचाव दिवस’,धरणे आंदोलन करण्यात आले.बीड जिल्ह्यात ही मोहिम सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचली.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी या बाबत बोलताना नमुद केले आहे की,भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन विधयके संसदेत मंजूर करून घेतली असून या नवीन काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.या विधेयकांच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यांवर येऊन याला तीव्र विरोध करत असताना हे निर्दयी सरकार माञ त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीमार करत आहे.या सरकारचा पूर्वानुभव पाहता ते संसदेसह कोणाशीही चर्चा वा संवाद न साधताच गरीब शेतक-यांवर हे कायदे लादत आहेत.हे अन्यायकारक आहे.या पार्श्वभूमीवरच काँग्रेस अध्यक्षा मा.सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्मानिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्यासह हजारो शेतकरी,शेतमजूर,कामगार यांचा सहभाग आहे.
काळ्या कायद्याच्या माध्यमातून भाजप देशातील हरित क्रांती नष्ट करणार–राजकिशोर मोदी
भाजपाने निवडणूकीच्या जाहिरनाम्यात दिलेले उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भावाचे आश्वासन याला पुर्णपणे हरताळ फासत कुठलही चर्चा न करता केवळ बहुमताच्या जोरावर तीन शेतकरी विरोधी काळे कायदे व विधेयक मंजुर केले आहेत.काळ्या कायद्याच्या माध्यमातून भाजप देशातील हरित क्रांती नष्ट करणार अशी शक्यता आहे.कारण,अंबानी,अदानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींना फायदा होण्यासाठी व स्वतःचे हित साधण्यासाठी शेतकरी व शेतमजुरांचे स्वातंत्र्य हिरावणारे हे कायदे आहेत.या कायद्यांवर सर्वपक्षीय चर्चा अपेक्षीत होती.परंतु,ती झाली नाही.हे दुर्दैवी आहे.महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,माजी प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण,वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने पारीत केलेले काळे कायदे महाराष्ट्र सरकार राबविणार नाही.ही काँग्रेसची भूमिका आहे.शेती, शेतकरी व शेतमजुर विरोधी विधेयकांचा जाहीर निषेध करीत आहोत.याला पाठबळ म्हणून काँग्रेसच्या वतीने 2 ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत शेतकरी,शेतमजूर,बाजार समितीमधील दुकानदार आणि कामगार,कष्टकरी यांच्या हितासाठी सह्यांची मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेतून 2 कोटी सह्यांचे निवेदन तयार करण्यात येणार आहे.कोविडचे सर्व नियम व अटी पाळून गाव-खेडी,शहर,शेती येथे ही सह्यांची मोहिम राबविली जात आहे.सह्यांचे निवेदन हे बीड जिल्हा कमिटी मार्फत एकत्रित करून ते प्रदेश कमिटीकडे पाठविणार आहे.तरी बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 2 ते 31 ऑक्टोबर 2020 या दरम्यान सह्यांची मोहीम राबविण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.
11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी किसान संमेलन
शेतकरी,शेतमजूर,बाजार समितीमधील दुकानदार आणि कामगार,कष्टकरी यांच्या हितासाठी आणि केंद्रातील भाजपा सरकारने देशातील शेतकरी,शेतमजूर व हरीत क्रांती नष्ट करण्यासाठी आणि खाजगी उद्योगपतींना बळ देण्यासाठी जे कायदे मंजूर केले आहेत त्याला विरोध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून रविवार,दिनांक 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी किसान संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे प्रसारण बीड जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात होणार आहे.या माध्यमातून भाजपा सरकारने पारीत केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांचे वास्तव जाणून घेण्यासाठी शेतकरी,मजूर,कामगार हा वर्ग व्हिडिओ काॅन्फरसिंगच्या द्वारे सहभागी होणार आहे.