फ्रान्समध्ये हवेतच दोन विमानांची भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

पॅरिस:वृत्तसंस्था― फ्रान्स देशामध्ये एक विमानाची भीषण दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेमध्ये तब्बल ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रवासी विमानाने मायक्रोलाईट विमानास धडक दिल्याने ही दुर्घटना झाली. पश्चिम फ्रान्समध्ये ही घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ४.३०च्या सुमारास दोन विमानांमध्ये टक्कर झाली होती.

या अपघातात आतापर्यंत ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती देताना सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या की, मायक्रोलाईट विमानात दोनजण प्रवास करत होते ज्याने डीए४० या प्रवासी विमानाला भीषण धडक दिली. या प्रवासी विमानात ३ जण प्रवास करत होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मायक्रोलाईट विमान एका घराजवळ उतरलं तर दुसरं प्रवासी विमान हे एका स्थानिक ठिकाणी लँड झालयाच समजत आहे. सुदैवाने घराजवळ विमान पडल्यानंतर कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. पण विमानात असलेल्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवेतच भिषण धडक झाल्यामुळे या विमानांनी पेट घेतला.अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहांना शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतल आहे तसेच पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.