जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― मराठवाड्यात सीताफळाची विक्रमी उत्पन्न देण्यात अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्याच्या सीताफळाचा गोडवा राज्यभर पसरत असतांना राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पळसखेड ता.सोयगाव येथील निसर्ग कवी यांच्या सीताफळ बागांना भेट देवून पाहणी केली.
कृषी सचिवांच्या दौऱ्यात निसर्ग कवी ना,धो महानोर यांनी सीताफळ लागवडी पासून ते उत्पन्नापर्यंत प्रवासाची माहिती दिली.यावेळी कृषी सचिव डवले यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून झालेल्या विविध कामांची पाहणी करून सोयगाव तालुक्याचे अधिक-अधिक क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लह देण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाला केले.यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजनांच्या झालेल्या कामांचा आढावा घेवून पाहणी केली.शेततळे,नाले खोलीकरण आदी कामांची पाहणी केली.यावेळी निसर्ग कवी ना.धो महानोर यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांना सीताफळाची भेट दिली.यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण,कृषिभूषण रवींद्र पाटील,दिलीप पाटील,तालुका कृषी अधिकारी संगीता पवार,मंडळ कृषी अधिकारी संपत वाघ,दीपक बिऱ्हारे,कविता अहिरराव,आदींची उपस्थिती होती.
जरंडीच्या सीताफळाचा गोडवा भेट-
जरंडी ता.सोयगाव येथील शेतकरी दिलीप पाटील यांच्या सीताफळ बागेतील सीताफळाचा गोडवा कृषी सचिव एकनाथ डवले यांना निसर्ग कवी ना.धो महानोर यांच्या हस्ते भेट देण्यात आला.यावेळी शेतकरी दिलीप पाटील,रवींद्र पाटील यांची उपस्थिती होती.