सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― अध्यात्माला मानवी संस्कृतीची जोड हे एक समीकरण असतांना अध्यात्म टिकविण्यासाठी मुक्या प्राण्यानेही प्रयत्न केल्याचा प्रकार शनिवारी जरंडी ता.सोयगाव येथे उघडकीस आला असून या अध्यात्मावर विश्वास ठेवणाऱ्या या मुक्या प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
जरंडी ता.सोयगाव येथील एक गाय चक्क चरायला जातांना गुरांच्या कळपातून आधी मंदिरात जावून देवदर्शन घेते हि कहाणी नव्हे तर जरंडी ता.सोयगाव येथील सत्य घटना आहे.जंगलात जाण्यापूर्वी रस्त्याने जातांना कळपातून आधी मंदिरात आणि त्यानंतर कळपात जाण्याचा नित्यक्रम जरंडी ता.सोयगाव येथील एका गायीचा आहे.या मुक्या प्राण्याचाही देवावर विश्वास आहे.हे एक भक्तीचे ज्वलंत उदाहरण प्रत्यक्षात साकारले आहे.जरंडी गावातील एक गाय नेहमी गुरांच्या कळपात चरायला जातांना रस्त्याने असलेल्या एका मंदिराकडे जात असते,परंतु हि गाय नेमकी जाते कुठे याचा शोध घेण्यासाठी गावातीलच विष्णू वाघ आणि दिलीप गाडेकर या तरुणांनी शनिवारी घेतला असता हि गाय चक्क एका हनुमानाच्या मंदिरात दर्शन घेतांना डोक टेकवितांना त्यांना आढळून आल्याने या तरुणांनी गावातील ग्रामाथांना या प्रकारची माहिती दिल्यावर ग्रामस्थ या मंदिराजवळ गोळा होवून अक्ख्या गावाने हा प्रकार पहिला.माणसाळलेल्या गायीला मात्र अध्यात्माचा छंद लागला कुठून याचाच सर्वजण विचार करत होते मात्र हि गाय दररोज याच मंदिरात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हि गाय गावातच मोकाट म्हणून सोडण्यात आली आहे.परंतु गावातील गुराखी या गायीला अनेक वर्षापासून मोफत चरायला जंगलात घेवून जात असतो.गाय मोकाट सोडलेली असल्याने या गायीकडे कुणाचेच इतके बारकाईने लक्ष नव्हते परंतु चरायला जातांना हि गाय कळपाची वात चुकवून जाते कुठे याचे उत्तर मात्र शनिवारी मिळाले आहे.