सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अति गंभीर होत चालला आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार अत्याचार विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरूच आहे.याचा निषेध म्हणून सोमवारी तहसील कार्यालयावर तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने टाळ-मृदुंग वाजवून झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी तीव्र आंदोलन छेडून सरकारच्या या कार्तुत्वाबद्दल लेखी निवेदन देण्यात आले. महिला सुरक्षेबाबत शासन असंवेदनशील व निष्क्रिय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहेयासाठी त्वरित SOP बनवण्यात यावी यासाठी तालुका भाजपा महिला आघाडी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई काळे यांच्या नेतृत्वात सोयगाव तहसीलकार्यालय येथे टाळ मृदुग व भारुडे म्हणून ह्या झोपी गेलेल्या तिघाडी सरकारला जाग अन्या साठी तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले यामध्ये सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोयगाव च्या वतीने महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.मिराताई उत्तम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे, नगराध्यक्ष कैलास दादा काळे,नगरसेविका शोभाताई मोरे, वर्षा मोरे,वंदनाताई बनकर,आशाताई तड़वी,लिलाबाई जाधव,शहराध्यक्ष सुनील ठोंबरे, राउफ देशमुख,प.स.सदस्य संजीवन सोनवणे,बद्री राठौड,कादिर शहा, दिलीप पाटिल,संजय मोरे,मुन्ना ढगे,उत्तम चव्हाण,नंदू शेळके,समाधान आगे, मंगेश सोहनी,मयूर मनगटे,सीताराम सोनवणे,सुनील चौधरी,शांताराम खराटे,बलीराम सोनवणे यांच्या सह सोयगाव महिला मोर्चाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.