सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतांना,सध्या उत्पन्नात मोठी घट आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी सरसगट हेक्टरी पन्नास हजार आणि तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी पक्षाच्या वतीने तहसीलदार प्रविण पांडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,सोयगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने अर्थसहाय्य करण्यात यावे तसेच बँक,वित्तीय संस्था,सूक्ष्म कर्ज संस्था शेतकऱ्यांना कर्जाचे प्रलंबित हप्ते वसुलीचा तगादा लावत आहे.वसुलीचा तगादा तातडीने बंद करण्याबाबत संबंधित संस्थांना सूचना करण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.इंद्रसिंग सोळून्खे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.यावेळी शहरध्यक्ष रवींद्र काळे,तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजू दुतोंडे,नंदू सोळुंके,राजू दाभाडे,सुरेश सोळुंके,चंदू काळे,दिपक देशमुख,अनिस तडवी आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.