जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कवली ता.सोयगाव गावाला पाणी पुरवठा होणाऱ्या विहिरीतच क्षारांचे प्रमाण वाढलेले असल्याने गावाचे आरोग्य धोक्यात आले असून हे पाणी पिण्यात आल्याने ३५ जणांना बाधा झाली असून तीन वर्षापूर्वी क्षारयुक्त पाणी पिण्यात आल्याने पाच जणांचा किडनी निकामी होवून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
कोरोना संसर्ग आटोक्यात असलेल्या कवली ता.सोयगाव पाणी पुरवठा करणारया विहिरीतील पाण्यात क्षमतेपेक्षा जास्त क्षार असल्याने या गावात पिण्याच्या पाण्यातून बाधा होत आहे.आठवडाभरात तब्बल ३५ जणांना उलट्या,संडासचा त्रास सुरु झालेला असून पिण्याच्या पाण्यातून येथील ग्रामस्थांना किडनी निकामी होण्याचा संसर्ग होत असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान पाण्यातून बाधा झालेल्या ३५ जणांना खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे.परंतु गावातील क्षारयुक्त पाण्याची विल्हेवाट लावण्यात तालुका प्रशासन असमर्थ ठरत असल्याने या गावाला कोरोना संसर्गापेक्षा नव्याने क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी निकामी होण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे.गावात अद्यापही १० च्या वर वृद्ध ग्रामस्थांना त्रास होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
क्षार वाढल्याने पाणी पिण्यास अयोग्य ,परंतु प्रयोग शाळा म्हणते पिण्यास योग्य—
कवली ता.सोयगाव हे गाव डोंगराला लागून आहे.या गावाच्या भूगर्भात क्षारचे प्रमाण अधिक असल्याने हे क्षार जमिनीतील पाण्यात मिसळून पिण्याच्या पाण्यात येत आहे.मात्र प्रत्येक महिन्याला