सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह परिसरात यंदा सीताफळाचे विक्रमी उत्पन्न हाती आले असून शहरात सीताफळ विक्रीने वेग धरला आहे.मात्र यंदा भाव नसल्याने सीताफळ विक्रेते हवालदिल झाले आहे.
सोयगावच्या वेताळवाडी जंगलातील सीताफळ प्रसिद्ध आहे.सोयगाव परिसरात सीताफळ लागवडही करण्यात आली असून काही शेतकऱ्यांनी सीताफळ लागवडीतून उत्पन्न घेण्याचा पर्याय निवडला होता.उत्पन्न भरघोस मिळाले परंतु सोयगावच्या प्रसिद्ध सीताफळाला योग्य भाव न मिळाल्याने यंदा सीताफळ उत्पादकांना दिलासा मिळाला नव्हता.
वीस ते पंचवीस रु किलोने विक्री–
यंदा भरघोस उत्पन्न मिळालेल्या सीताफळाला केवळ वीस ते पंचवीस रु भाव आहे.त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना परवडेनासा भाव असून मात्र विक्री जोरात सुरु झालेली आहे.
ढगाळ वातावरणाने गळ–
सोयगाव परिसरात शेतकऱ्यांनी सीताफळ लागवड केलेली असून यंदा अतिवृष्टी,अवकाळी पावूस आणि सततच्या ढगाळ वातावरणाने सीताफळांची झाडावर गळ वाढलेली आहे.त्यामुळे गळ होवून झाडावरील फळे शेतातच गळून पडली आहे.मिलीबगच्या प्रादुर्भावापासून सीताफळाना दूर ठेवण्यात यंदा शेतकऱ्यांना यश आले परंतु गळ मात्र वाढली आहे.