अंबाजोगाई (प्रतिनिधी):ऊस उत्पादक शेतकरी सभासद,कामगार यांच्या हितासाठी अंबासाखर ही सहकारी संस्था टिकली पाहिजे.या भूमिकेतून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ नव्या जोमाने प्रयत्न करीत आहे.सध्या कारखाना कार्यक्षेत्रात ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.अंबासाखर कारखाना ऊस गाळपाचे योग्य नियोजन करेल.अशावेळी अंबासाखर सारखी संस्थाच शेतकर्यांच्या मदतीला येणार आहे.अंबासाखरच्या गळीत हंगामास लवकरच प्रारंभ होणार आहे.यावर्षी 4 लाखांहून अधिक ऊसाचे गाळप होईल अशी माहिती कारखान्याचे चेअरमन रमेश बाबुरावजी आडसकर दिली.ते अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदिपन कार्यक्रमात बोलत होते.
अंबासाखरच्या सन 2020-21 च्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदिपन समारंभ सोमवार,दि.19 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश साखरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मायाताई साखरे यांच्या हस्ते कोरोनाच्या परिस्थितीत अत्यंत साधेपणाने बॉयलरचे विधिवत पुजा करून संपन्न झाला.यावेळी कारखान्याचे चेअरमन रमेश बाबुरावजी आडसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कारखान्याचे संचालक राजकिशोर मोदी,शेषेराव नांदवटे,दाजीसाहेब लोमटे, मारोतीराव साळुंके,जनार्धनराव माने, औदुंबर शिंदे,निवृत्तीराव चेवले,अजय पाटील, गौतमराव चौधरी,माजी संचालक बालासाहेब इंगळे उपस्थित होते.यावेळी बोलताना चेअरमन रमेश आडसकर म्हणाले की,यावर्षी कारखाना चांगला चालण्यासाठी संचालक मंडळाने योग्य नियोजन केेले आहे.त्यास कर्मचार्यांची उत्तम साथ मिळत आहे.कारण,कारखाना दुरुस्तीचे काम कर्मचार्यांनी अत्यंत गतीने केले त्याबद्दल कर्मचार्यांचे अभिनंदन करीत आडसकर म्हणाले की,हा कारखाना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही काटकसरीतून व आर्थिक अडचणीतून मार्ग काढून चालवत आहोत.हा कारखाना टिकण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करीत आहोत पुढील वर्षी इथेनॉल प्रकल्प सुरु करणार आहोत.बॉयलर अग्नी प्रदिपन हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अत्यंत साधेपणाने आयोजित केला आहे.लवकरच गळीत हंगाम प्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी,कार्यक्षेत्रातील मान्यवर,पत्रकार व हितचिंतक यांना निश्चितपणे निमंत्रित करु असे सांगुन या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे ऊसाचे उत्पादन वाढणार आहे.त्यामुळे अंबासाखरच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला ऊस अंबासाखरला द्यावा असे आवाहन आडसकर यांनी केले.तर कारखान्याचे संचालक राजकिशोर मोदी म्हणाले की,रमेश आडसकरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत अडचणीतून मार्ग काढून हा कारखाना सुरू केला आहे.रमेशराव आडसकरांचे हे मोठे धाडस आहे अत्यंत जुना असलेला कारखाना लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर साहेबांनी नावारुपाला आणला.आज हा कारखाना चांगला चालवून शेतकरी,कामगार यांचे हित साधण्याचा प्रयत्न आज रमेशराव करीत आहेत.अंबासाखरला गतवैभव मिळवून देण्यासाठी आडसकर प्रयत्नशील आहेत असे मोदी म्हणाले.हा कार्यक्रम कोरोनाच्या परिस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने झाला.कोणालाही निमंत्रित न करता फक्त कारखान्याचे संचालक,कामगार यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली.यावेळी आयोजित कार्यक्रमास कारखान्याचे खातेप्रमुख चिफ इंजिनिअर ए.आर.भगत,मुख्य शेतकी अधिकारी आर.आर.देशमुख, चिफ केमिस्ट डि.बी.वारे,फायनान्स मॅनेजर जि.एस.मुळे, इंजिनिअर पवार,चिलवंत,डिस्टलरी इन्चार्ज एस.डि.तवर, नरसिंग सोमवंशी,युवराज शिंदे,गोरख चौधरी,भरत चव्हाण, गोविंद किर्दंत सर्व विभागाचे प्रमुख,कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रेमचंद पवार यांनी करुन उपस्थितांचे आभार कारखान्याचे संचालक मारोतीराव साळुंके यांनी मानले.