अनुदानास पात्र १६५ आश्रमशाळांवर अन्याय, शंभर टक्के अनुदान मागणीसाठी संघर्ष समिती करणार रास्ता रोको

Last Updated by संपादक

अंबाजोगाई (प्रतिनिधी):
अनुसूचित जातीच्या २००६ साली मान्यता प्राप्त २८८ आश्रम शाळांपैकी अनुदानास पात्र असलेल्या १६५ आश्रम शाळांना आठ दिवसांच्या आत तात्काळ १००% अनुदान न दिल्यास राज्य महामार्ग लोखंडी सावरगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा अनु.जाती आश्रम शाळा अनुदान संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष लहू बनसोडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना शुक्रवार,दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,प्राथमिक व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना १४ ऑक्टोबर २०२० रोजी सर्व शाळांना २०% अनुदान असलेल्या ४०% अनुदान,शुन्य % टक्के अनुदान असलेल्या शाळांना २०% अनुदान शाळांना ३९५ कोटी रूपये बजेट टाकले आहे.त्यामुळे राज्यातील २००६ साली मान्यता प्राप्त असलेल्या २८८ आश्रम शाळांपैकी अनुदानास पात्र असलेल्या १६५ आश्रम शाळांना ८ मार्च २०१९ रोजी २०% अनुदान जाहीर झाले होते.या शाळांच्या ९ जानेवारी २०२० रोजी या शाळांची तपासणी झालेली आहे.तरी या शाळांना अनुदान न देता राज्यातील इतर सर्व जनरल शाळांना ३९५ कोटी रूपये शासनाने अदा केले.परंतु,अनुसूचित जातीच्या निवासी असलेल्या आश्रम शाळांना एक दमडी ही अनुदान दिलेले नाही.या शाळांना मान्यता मिळाल्यापासून ६ महिन्यांत अनुदान दिले जाते.परंतु, अनुसूचित जातीच्या निवासी आश्रम शाळा असलेल्या आश्रम शाळांनाच अनुदान अदा केले नाही.हा अनुसूचित जातीच्या आश्रम शाळा संस्था चालक,कर्मचारी यांच्यावर अन्याय आहे.हा जाणून बुजून केलेला अन्याय असून हा अन्याय आठ दिवसांच्या आत दूर करून अनुदानास पात्र असलेल्या १६५ आश्रम शाळांना तात्काळ ८ मार्च २०१९ च्या निर्णयानुसार १००% अनुदान अदा करावे अन्यथा आम्हाला राष्ट्रीय महामार्ग लोखंडी सावरगाव येथे रस्ता रोको आंदोलन करावे लागेल याची सर्वस्वी जबाबदारी ही शासन व प्रशासन यांची राहील.निवेदनाच्या प्रतीलिपी १) महाराष्ट्राचे राज्यपाल,२) मा.सामाजिक न्याय मंत्री,३)पोलीस अधीक्षक,बीड,४) पोलीस निरीक्षक,ग्रामीण पोलीस ठाणे यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.