गोंदेगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय औरंगाबाद येथील कृषिदूत गौरव प्रदीप येवले यांनी कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना जैविक आणि रासायनिक पद्धतीने बीजप्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी गाव परिसरातील शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया पद्धतीचा पेरणीसाठी कसा वापर करावा याबाबत माहिती दिली. बीजप्रक्रिया पद्धतीमुळे पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते. तसेच रोग नियंत्रणाच्या खर्चात बचत होते. बियाण्यांची उगवण क्षमता वाढून उत्पन्नात वाढ होते. बियाणांचा दर्जा वाढवला जाऊन बाजार भाव चांगला मिळतो. हे लक्षात घेऊन गौरव येवले यांनी बीजप्रक्रिया पद्धत कशी करावी, त्याचे फायदे व परिणाम याबाबत माहिती दिली. तसेच आधुनिक शेतीसाठी मोबाईल अँप व त्याचा वापर कसा करावा, तण नियंत्रणाच्या पद्धती , फळ पिकांसाठी खतांचा योग्य वापर, शून्य ऊर्जा क्षमतेने भाजीपाला कश्या पद्धतीने साठवावा याची माहिती दिली. या वेळी श्री सखाराम माळी, हेमंत पाटील, प्रशांत पवार आदी शेतकरी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन एम म्हस्के, कार्यक्रम समन्वयक प्रा.वी ओ कोहिरे पाटील, विषय तज्ञ आगळे सर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्याकांचे मार्गदर्शन लाभले.