औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― येथील काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या औरंगाबाद शहर जिल्हा प्रवक्ता पदावर निवड करण्यात आली.महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत व अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली.डॉ. मिलिंद आठवले आंबेडकरी विचारांचे अभ्यासक व माध्यमांचे विश्लेषक व लेखक आहेत तसेच कामगार व विद्यार्थी संघटनेत सामाजिक-धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो, डॉ. आठवले सध्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.आठवले यांना औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अरुणभाऊ शिरसाट यांनी नियुक्तीपत्र दिले.याबद्दल डॉ.आठवले यांचे प्रा. यु. व्ही.पवार,श्याम टरके,देवधन जंगाळे,संतोष निकाळजे, सुभाष इंगळे,अमर हिवराळे व प्रशांत पगारे आदींनी अभिनंदन केले,तसेच सर्व नातेवाईक मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.