औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

वीजपोलची वाहिनी तुटल्याने पाणी पितांना दोन म्हशींचा चिकटून ठार ,सोयगावातील घटना

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव जवळील नाल्यालगत चरत असलेल्या १२ म्हशी नाल्यातील पाण्यात पाणी पिण्यासाठी गेल्या असता या नाल्याच्या पाण्याजवळ वीज पोलची(गारडिंग)मुख्य वीजवाहिनी तुटून पडली असल्याने दोन म्हशींचा चिकटून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.या घटनेत शेतकऱ्याचे दोन लक्ष रु इतके नुकसान झाले आहे.या प्रकरणी मात्र पंचनाम्यासाठी टोलवाटोलवी सुरु असल्याचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याने सांगितले.

सोयगाव ३३के.व्ही. वीजउप उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या १३२ के.व्ही वीज केंद्राचा पोल एका पडीक शेतात आहे.या पोल जवळच असलेल्या नाल्यालगत १२ म्हशी चरत असतांना नाल्यावर पाणी पिण्यासाठी गेल्या असता त्यातील दोन म्हशींना या तुटलेल्या वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याचे गुराखी अमोल भरवाड यांच्या लक्षात आले परंतु तोपर्यंत म्हशींना वीज वाहिनीने मृत्युच्या दारात ओढलेले होते पाणी पिताच या दोन म्हशींना मृत्युच्या दाढेत अडकावे लागले या घटनेमुळे सोयगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    सोयगाव-बनोटी रस्ता ठप्प-

    १३२ वीज उपकेंद्र आणि ३३ के.व्ही वीज उपकेंद्र या अंतरदरम्यान सोयगाव-बनोटी रस्ता आहे.तुटलेली वीज वाहिनी तासभर रस्त्यावर लोळत असल्याने वीज वाहिनीच्या धास्तीने सोयगाव-बनोटी वाहतूक तासभर ठप्प झाली होती.घटनेची माहिती मिळताच लाईनमन विष्णू लाड,जनार्धन जोहरे,सागर तेली के.व्ही बारेला,पि.बी पावरा आदींच्या पथकाने तातडीने युद्ध पातळीवर गारडिंगची तुटलेली वीज वाहिनी दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळी

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.