सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― एस.टी परिवहनच्या बसेस जिल्ह्याबाहेर सुरु झाल्यानंतर कोरोना पाठोपाठ अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि यामुळे शेतकरी व मजूर हातावर आल्याने याचा फटका एस.टीला बसला असून एस.टी चे उत्पन्न घटले असल्याची माहिती आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी सोमवारी दिली.
सोयगाव आगाराच्या जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर ४१ फेऱ्या सुरु झालेल्या आहे.मात्र दोन महिन्यापासून उत्पन्नात सातत्याने घट येत असून ग्रामीण भागात प्रवाशांचा एस.टी ला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे तुटपुंज्या उत्पन्नावर सोयगाव आगाराची जीवनवाहिनी सुरु आहे.सोयगाव आगारातून चार हजार किलोमीटरच्या प्रवासाचा पल्ला एस.टी गाठत असतांना मात्र त्यापोटी ५० ते ६० हजार उत्पन्न हाती येत असून इंधनाचा प्रतिदिन खर्च ८० हजार लागत असल्याने उत्पन्नात मोठी तुट निर्माण होत आहे.४१ रु १७ पैसे प्रती उत्पन्नाची हमी असतांना एस.टी च्या हातात केवळ १७ रु ३९ पैसे याप्रमाणे उत्पन्न मिळत आहे.त्यामुळे जिल्ह्यात सोयगाव आगारावर उत्पन्नाचे संकट कोसळले आहे.
कर्तव्याची वेळ पाळू नका-
सोयगाव आगाराच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर होतांना घरी जाण्यासाठी कर्तव्याची वेळ काटेकोर पाळू नका बस मध्ये प्रवाशी आल्याशिवाय संबंधित मोठ्या स्थानकावरून बस न हलविण्याच्या सूचना आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी चालक,वाहक यांना दिल्या असल्याने घरी जाण्याच्या वेळेत पालन न करता एस.टी ला प्रवाशी मिळण्याची चिंता करण्याचे सूचना दिल्या आहे.एस.टी च्या उत्पन्नात तोटा आल्यास संबंधित चालक वाहकांना करणे दाखवा बजावण्यात येईल अशा सूचनाही देण्यात आल्या असल्याने सोयगाव आगाराच्या सुरु असलेल्या ४२ फेऱ्या सध्याच्या स्थित�