सोयगाव तालुक्यात दुसरी कापूस वेचणी बोंडे फोडून ,नुकसानीची पातळी वाढली

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कापसाची पहिली टप्प्यातील वेचण्या आटोपल्या असतांना दुसऱ्या टप्प्यात कापूस वेचणी करण्यासाठी चक्क कापसाची बोंडे फोडून वेचण्या हाती घेण्याची वेळ सोयगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.यावरून सोयगाव तालुक्यात कापूस पिकांच्या झालेल्या नुकसानीची तीव्रता आढळून आली आहे.

मराठवाड्यात कापूस उत्पन्नात अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्यात कापसाच्या पहिल्या टप्प्यातील वेचण्या आटोपल्या असून रविवार पासून दुसऱ्या टप्प्यातील वेचण्या हाती घेण्यात आल्या असतांना या वेचण्या करण्यासाठी मजुरांना चक्क झाडावरील कापसाची बोंडे तोडून हातांनी फोडून त्यामधून कापूस बाहेर काढावा लागत आहे.यावरून सोयगाव तालुक्यातील कापसाच्या नुकसानीची पातळी दिसत आहे.दरम्यान सोयगाव तालुक्यात दुसऱ्या वेचण्या करण्याच्या कालावधीतच कपाशीचा हंगाम संपला आहे.कापूस पिकांवरील तीन ते चार वेचण्या घेण्यात सोयगाव तालुका अग्रेसर असतांना यंदाच्या हंगामात मात्र दुसऱ्याच वेचण्यात कपाशीचा हंगाम संपला असून यानंतर मात्र कपाशी पिके उखडून फेकावी लागणार आहे.

चौकट-अतिवृष्टीच्या उघडिपीनंतर सोयगाव तालुक्यात कपाशीच्या पिकांच्या नुकसानीची पातळी वाढली असून अतिवृष्टी आणि आक्टोंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने सोयगाव तालुक्यात कपाशीचे बरेच क्षेत्र पाण्यातच बुडून होते अवकाळी आणि अतिवृष्टीचं पावसाने सतत भिजलेली कपाशीचे बोंडे मात्र आक्टोंबर महिन्यात आठवड्यापासून उन्हाच्या कडाक्यात कुजली आहे.पहिल्या टप्प्याच्या वेचण्या सुरक्षित झाल्या परंतु दुसऱ्या वेचणीच्या कालावधीत उन्हाचा तडाखा आणि अतिवृष्टीत बसलेला तडाखा या दुहेरी वातावरणाने हि बोंडे कापूस फुटताच कुजली आहे.त्यामुळे झाडावरील कुजलेली बोंडे हातांनी फोडून कापूस वेचणी घ्यावी लागत आहे.

या नुकसानीची तीव्रता प्रशासनाला दिसेना-

अतिवृष्टीच्या तडाख्यात फटका बसलेल्या कपाशी पिकांची वाढ व परिपक्वता होण्याची प्रतिकार शक्ती संपल्याने उन्हाच्या तडाख्यात होरपळलेली कपाशी पिकांच्या कुजलेल्या कैऱ्याचे नुकसान मात्र प्रशासनाला दिसत नसून मात्र या नुकसानीतून शेतकरी सावरला जाणार बसून आगामी आठवड्यात सोयगाव तालुक्यात कपाशी हंगाम संपलेला दिसणार आहे.याबाबत मात्र तालुका प्रशासन डोळेझाकून आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.