शिस्त व परिश्रम सातत्यातून कृषि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढेल – कुलसचिव रणजित पाटील

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―कृषि महाविद्यालयात दि.२१ ऑक्टोबर रोजी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होत याप्रसंगी मार्गदर्शन करताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव श्री.रणजित पाटील म्हणाले की, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी संस्था ही केंद्रबिंदू मानून नियमितपणे परिश्रम करून शिस्तप्रिय असावे. यातूनच कृषि विद्यार्थी, शेतकरी व कष्टकरी यांचे हित साधले जाईल. या महाविद्यालयात घन वृक्षरोपणामुळे परिसर सुशोभित झाल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे. यातून भविष्यकाळात पशुपक्षी थांबे वाढतील व पर्यावरण संतुलनात मदत होईल. कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी खरीप हंगामातील बिजोत्पादन कार्यक्रमाचा आढावा व रबी हंगामासाठीचे नियोजन सादर केले. यावेळी डॉ.अरूण कदम, डॉ.प्रताप नाळवंडीकर, डॉ.बसलिंगअप्पा कलालबंडी, डॉ.दिपक लोखंडे, डॉ.सुहास जाधव, प्रा.सुनिल गलांडे व प्रा.विद्या तायडे यांची प्रमुख उपस्थीती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.नरेश जायेवार यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता डॉ.योगेश वाघमारे, श्री.भास्कर देशपांडे, श्री.अनंत मुंडे, श्री.सुनिल गिरी, श्रीमती मनिषा बगाडे, श्रीमती पुजा वावरगिरे, श्री.सय्यद इरफान, यादव पाटील व स्वप्नील शिल्लार यांनी विशेष परिश्रम घेतले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.