कै.शंकरराव गुट्टे महाविद्यालयात अभियांत्रिकी समकक्ष पदवी अभ्यासक्रमास युजीसीची मान्यता -प्राचार्य डॉ.ताराचंद होळंबे यांची माहिती

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास धोरणानूसार विद्यापीठ अनुदान आयोगाने धर्मापूरी येथील कै.शंकरराव गुट्टे महाविद्यालयात ”इलेक्ट्रीक टेक्नॉलॉजी” या पदवी अभ्यासक्रमास सन 2020-21 पासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ताराचंद होळंबे यांनी दिली आहे.

सदर अभ्यासक्रम हा तीन वर्षांचा असून कोणत्याही शाखेचा 12 वी पास व M.C.V.C. व I.T.I. उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेवू शकतो.हा अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख तर आहेच पण,या शिवाय पदवी प्राप्त विद्याद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त करण्याची हमी देखील यात आहे.प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चीत करावा असे आवाहन प्राचार्य डॉ.ताराचंद होळंबे यांनी केले.या बाबत बोलताना प्राचार्य डॉ.होळंबे यांनी नमूद केले आहे की,दिवंगत लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आशिर्वादाने व स्व.प्रमोदजी महाजन साहेबांच्या कृपेने धर्मापूरी येथे चालू असलेल्या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमास मंजूरी देण्याच्या कामी माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या विद्यमान खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गुट्टे यांनी समाधान व्यक्त केले व महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व प्राध्यापक,कर्मचारी वृंद यांचे अभिनंदन केले.या प्रसंगी परीक्षा केंद्रप्रमूख व सर्व विभागांचे विभागप्रमुख तसेच सर्व सह.प्राध्यापक मंडळी शिक्षकेत्तर सर्व कर्मचारी उपस्थित असल्याची माहिती वाणीज्य विभागप्रमुख प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर यांनी दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.