जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचशे रुपयाच्या केबलअभावी जरंडी ता.सोयगाव येथील बी.एस.एन.एलचा मनोरा चार दिवसापासून बंद झाला असून वीजजोडणी केलेल्या रोहीत्रापासून मनोऱ्यापर्यंतची सर्विस केबल जळाल्याने हि केबल खरेदीसाठी संबंधित विभागाकडे पाचशे रुपये नसल्याची खळबळजनक माहिती हाती आली असून त्यामुळे मात्र चार गावांची सेवा खंडित झाल्याने शालेय विद्यार्थ्याचे ऑनलाईन धडे घेण्याचे शिक्षण थांबले आहे.
जरंडी परिसरातील चार गावांची मोबाईल सेवा एकाच बी.एस.एन.एल च्या मनोऱ्यावर अवलंबून आहे.मात्र या मनोऱ्याला जोडणी करण्यात आलेल्या वीजपुरवठ्याची केबल जळाली असून चार दिवसापासून केबलअभावी मनोरा ठप्प झाला आहे.बी.एस.एन.एल कडे मात्र पाचशे रु किमतीची केब्वळ खरेदी करण्यासाठी निधीच नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे.त्यामुळे एका केबलअभावी जरंडी,माळेगाव,पिंपरी आणि कंकराळा या चार गावांची नेटवर्क सुविधा ठप्प झाली आहे.
ठेका घेतलेल्या कंपनीचेही दुर्लक्ष-
जरंडी येथील मनोऱ्याचा देखभालीसाठी एका खासगी कंपनीला ठेका दिलेला आहे.मात्र या कंपनीच्या ठेकेदाराकडे केबल खरेदीसाठी पैसा नसल्याने हि केबल खरेदी रखडली असल्याने जरंडीच्या मनोऱ्याची सेवा खंडित झाली आहे.या कंपनीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.