सोयगाव तालुक्यात बोंडअळींचा प्रादुर्भाव…कपाशी वेचणीच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकरी चिंतेत

Last Updated by संपादक

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात कापूस वेचणीच्या दुसऱ्याच टप्प्यात शुक्रवार पासून कपाशीच्या बोंडात अळींचा प्रादुर्भाव आढळून आल्याने सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.बोंडअळींचा धोका टळला असल्याच्या स्थितीत असलेल्या सोयगाव तालुक्याला वेचणीच्या दुसऱ्या टप्प्यात बोंडअळींनी पोखरले आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यातील कपाशीचा हंगाम अखेरीस वाया गेला आहे.

सोयगाव तालुक्यातील ४३ हजार खरिपाच्या लागवडी क्षेत्रातील तब्बल ३२ हजार हेक्टरवर कपाशीची यंदा विक्रमी लागवड करण्यात आली होती.या कपाशी पिकांना अतिवृष्टी,सततचा पावूस आणि त्यापाठोपाठ अवकाळीचा तडाखा बसूनही शेतकऱ्यांनी आडव्या पडलेल्या कपाशीची पिके उभी करून त्यावर उत्पन्न घेण्याची मेहनत केली होती.पोळा सणाच्या अमावास्येनंतर सोयगाव तालुक्याला गुलाबी बोंडअळींचा धोका टळला असल्याचे चित्र निर्माण झाले होते किरकोळ किडी व्यतिरिक्त आणि मित्रकीटकांनी कपाशीला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना हातभार लावल्यानंतर मात्र कोजागिरी पौर्णिमेला सोयगाव तालुक्यात गुलाबी बोंडअळींचा कपाशीवर अटॅक झाल्याने शुक्रवारी सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली होती.थंडीची चाहूल लागण्याच्या पहिल्याच दिवशी कपाशीच्या परिपक्व झालेल्या बोंडात गुलाबी अळींचा वास्तव्य आढळून आले आहे.आधीच शासनाने अतिवृष्टीच्या नुकसानीतून निम्म्या सोयगाव तालुक्याला गायब केले असतांना अचानक तालुक्यात गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव आढळून आल्याने कपाशीचे पिके उखडून फेकण्याची वेळ आली आहे.

प्रत्येक बोंडात अळी-

उशिरा झालेल्या गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भावचा फटका इतका जोरात आहे प्रत्येक बोंडात अळीचे वास्तव्य आढळून आले आहे.त्यामुळे गुलाबी बोंडअळींचा उशिरा झालेला अटॅक मात्र जोरदार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.