सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव-बनोटी रस्त्यावरील कवली ता.सोयगाव गावाजवळील नळकांडी पुलावरील रस्ताच अतिवृष्टीत वाहून गेल्याने या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.कंबरे बरोबर खड्यातून वाहन टाकावे लागून जोड रस्त्यावर मिळावे लागत आहे.त्यामुळे नाल्यात वाहन पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सोयगाव-बनोटी रस्त्यावर कवली ता.सोयगाव गावाजवळ सार्वजनिक विभागाच्या रस्त्याला नळकांडी पूल आहे.या नळकांडी पुलाचा रस्ता अतिवृष्टीत वाहून गेल्याने या रस्त्यावरून वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत असून आगामी काळात दिवाळीचा सण आला असून या रस्त्यावरून दिवाळीच्या प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागणार आहे.संबंधित विभागाने अद्यापही या रस्त्याची डागडुजी केली नसून वाहनांना या पुलावरून हेलकावे खात जावे लागत असून वाहने या पुलावरून कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.