आगामी पंधरा दिवसात १२ खेड्यांच्या समस्या न सोडविल्यास अधिकाऱ्यांना गावबंदी करू -भाजपचे इद्रीस मुलतानी यांचा इशारा

Last Updated by संपादक

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सावळदबारा वीज उपकेंद्रातील १२ खेड्यांना गावठाण आणि शेती पंपाचा वीजपुरवठा सुरळीत न मिळाल्यास आगामी पंधरा दिवसात आंदोलन तीव्र करून सोयगाव तालुक्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांसह तालुका प्रशासनाच्या अधिकार्यांना गावबंदी करू असा इशारा देत भाजपाचा कार्यकर्ता संघर्षमय त्यामुळे आम्ही गुन्हे दाखल होण्यावर घाबरत नाही असा टोलाही पोलिसांना सावळदबारा येथील धडक मोर्च्यादरम्यान भाजप प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी लगावला.

भाजपाच्या वतीने सावळदबारा येथील वीज उपकेंद्रावर गुरुवारी भाजपाचं वतीने वीज पुरवठ्याच्या प्रश्नासाठी भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर,चिटणीस इद्रीस मुलतानी,ज्ञानेश्वर मोठे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी गावाच्या मंदिरापासून ते वीज उपकेंद्रापर्यंत पायी मोर्चा वीज उपकेंद्रावर धडकला.या मोर्चात सुरेश बनकर,इद्रीस मुलतानी,ज्ञानेश्वर मोठे,सुनील मिरकर,जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण,शिवाजी बुढाळ,गणेश लोखंडे,आदींनी मार्गदर्शन केले.यावेळी दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांचा धडक मोर्चा वीज वितरण कार्यालयावर धडकला होता.मोर्चात सरचिटणीस विजय वानखेडे,युवा मोर्चाचे ईश्वर क्षीरसागर,संजय चव्हाण,उत्तम चव्हाण,शिनगारे,राठोड,संभाजी पवार,पंजाबराव कोलते,आदींसह शेताकायांची उपस्थिती होती.यावेळी फर्दापूर,अजिंठा,सोयगाव पोलीस ठाण्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोर्चा संपताच अधिकारयांचे आश्वासन-

मोर्चा समोर महावितरणचं अधिकार्यांना शेतकऱ्यांच्या समोर बोलावून त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या असता आठवडाभरात या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन महावितरणचे उप कार्यकारी अभियंता नीरज बिडे यांनी दिले.यामध्ये १२ खेड्यांमध्ये लाईनमनच्या जागा भाराने,शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करणे,आदि विविध मागण्या होत्या.

-सुरेश बनकर यांनी बोलतांना सांगितले या १२ खेड्यांना केवळ २ हजार मेगावॉट वीज पुरवठा पुरेसा असतांना जळगाव जिल्ह्यातील गावांनाही या वीज उपकेंद्रातून पुरविण्यात येणाऱ्या ५ हजार मेगावॉट विजेचे देयके या शेतकऱ्यांकडून वसूल केली जातात या सुलतानी संकटाला शेतकरी कंटाळला आहे याची चौकशी न झालास टीकोरे मोर्चा काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.