अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― स्वामी रामानंद तिर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विभागीय निवड मंडळाच्या मार्फत 120/364 दिवसांच्या तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या सेवा नियमित करणे यासह इतर मागण्यांसाठी सोमवार,दि.2 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या अस्थायी सहाय्यक प्राध्यापक सामूहिक आंदोलनास बुधवारी महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे आरोग्य प्रदेशाध्यक्ष मुख्तार शेख,युवा जिल्हाध्यक्ष सादेख शाह,तालुकाध्यक्ष अकबर पठाण,युवा तालुकाध्यक्ष सय्यद अर्शद,शहराध्यक्ष अन्सार सय्यद,युवा शहराध्यक्ष शाहेब पठाण,शहर संघटक शारोक पठाण,युवा उपाध्यक्ष वसीम बागवान,दानिश भाई,निहाल सिद्दीकी यांनी आंदोलन करणा-या डॉक्टरांची भेट घेवून,चर्चा करून प्रश्न समजावून घेतले.यावेळी इतरांची उपस्थिती होती.