जळगाव जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्य किशोर पाटील कुं झरकर आणि जयश्री पाटील यांचा पत्र पाठवून केला गौरव
जळगाव:आठवडा विशेष टीम― कठीण अशा कोरोणा काळाच्या पार्श्वभूमीव सर्वच क्षेत्रात आव्हानांना सामोरे जावे लागत असून शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही.राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्ष सर्वत्र शाळा बंद परंतु शिक्षण सुरू ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले.बऱ्याच ठिकाणी वाडी वस्ती तांडा यांवर तसेच रेंज व्हावी तसेच पालकांच्या आर्थिक परिस्थिती अभावी ऑनलाइन शिक्षणात अडथळे निर्माण होत असताना जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात कृतिशील व उपक्रमशील म्हणून राज्यभर ओळख असलेले शिक्षक दांपत्य किशोर पाटील कुं झरकर व सौ जयश्री पाटील या पती-पत्नी शिक्षक दांपत्यास विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या अंगणातच शिक्षणाचे धडे देणारा घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम सुचला तो त्यांनी राबवला तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत हळूहळू हा उपक्रम लक्षवेधी ठरला अनुकरणीय गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंत च्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील सर्वगावपातळीपासून राज्यपातळी पर्यंतच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी सुट्टी उपक्रम म्हणून याची नोंद घेऊन त्यांचा वेळोवेळी उत्साह वाढवला.विविध दैनिक तसेच मीडिया तसेच न्यूज चैनल जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पंचायत समितीचे सभापती सर्व सदस्य सर्व शिक्षक व पत्रकार संघटना यांनी देखील या उपक्रमाची कठीण काळातील अनुकरणीय उपक्रम म्हणून दखल घेतली.
कोरोणा काळात राज्यात सर्वप्रथम स्वेच्छेने पुढाकार घेऊन अनुकरणीय प्रयोग राबवून आदिवासी वाड्या-वस्त्यांवर शिक्षण पो हचण्यासाठी ऑनलाईन प्रणाली यातील अडथळे दूर करणारा नाविन्यपूर्ण प्रयोग जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील शिक्षक दाम्पत्य किशोर पाटील कुं झर कर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदर्श शिक्षिका जयश्री पाटील यांनी यशस्वीरित्या राबवला. हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शुभेच्छा संदेश पाठवून नामदार वर्षाताई गायकवाड यांनी या एरंडोल तालुक्यातील गालापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापूर येथे कार्यरत शिक्षक दाम्पत्याचं विशेष बाब म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री या नात्याने शुभेच्छापर अभिनंदन पत्र पाठवून कौतुक केले आहे.
कठीण प्रसंगात कोरोना काळात सर्वत्र शिक्षण सुरू आहे देशात राज्यात सर्वत्र सर्व शिक्षक प्रेरणादायी कार्य करीत असून आपल्या छोट्या कृतीची घेण्यात आलेली दखल व सर्वांनी सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने वाढवलेला उत्साह राज्य शासन, केंद्र शासन, सर्व शिक्षक शालेय शिक्षण विभाग तसेच माझ्या राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षक संघटना करीत असलेले सकारात्मक प्रयत्न यामुळे प्रेरणा मिळते असे राज्यातील घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रमाचे जनक किशोर पाटील कुंझरकर , जयश्री पाटील यांनी प्रतिनिधीने संपर्क साधला असता म्हटले. दरम्यान जळगाव जिल्ह्याची शैक्षणिक क्षेत्रात या शिक्षक दांपत्याच्या कृतीमुळे दखल घेतली गेली व मान उंचावला गेला याचा सार्थ अभिमान वाटतो असे जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार सौ रंजना ताई पाटील, एरंडोल पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील, जिल्हा परिषद चे शिक्षण सभापती रवींद्र भाऊ पाटील ,जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, शशिकांत साळुंखे, पंचायत समितीचे सभापती अनिल भाऊ महाजन यांनी म्हटले व त्यांनी देखील विशेष पत्र यापूर्वीच पाठवून अभिनंदन केले आहे. जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य,शिक्षणाधिकारी भा शि अकलाडे , आरिफ शेख, रामचंद्र मोरे, एकनाथ सोनवणे,आर एम पवार धनराज बाप्पूमहाजन, गटशिक्षणाधिकारीविश्वास पाटील, विकास पाटील, नरेंद्र चौधरी, जेडी पाटील सर्व केंद्रप्रमुख यांनी अभिनंदन केले. दरम्यान राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे कर्तव्यदक्ष मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांनी पाठविलेले अभिनंदन पर शुभेच्छा पत्र प्राप्त झाले असून जळगाव जिल्ह्यातून तसेच राज्यातून सर्व क्षेत्रातून सर्वत्र सकारात्मक पद्धतीने कार्य करणाऱ्या व सतत धडपड करणाऱ्या या शिक्षक दाम्पत्यावर अभिनंदनाचा सर्व स्तरातून वर्षाव होत आहे. नामदार वर्षाताई गायकवाड यांनी विशेष शुभेच्छा पत्र पाठवून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील किशोर पाटील कुंझरकर व जयश्री पाटील कुंझरकर यांनी घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी या स्वच्छेने सुचलेल्या उपक्रमाची अंमलबजावणीआदिवासी वाडीवस्तीवर करून जेथे ऑनलाइन शिक्षण पोहोचण्यासाठी अडथळा आहे तेथे राज्यात सर्वत्र शिक्षण सुरू ठेवले जात असल्याचा प्रत्यक्ष कृतीयुक्त अनु कर नीय संदेश आपल्या उपक्रमातून दिला असल्याचा सार्थ अभिमान वाटतो शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्न अनोखा व आदर्श आहे. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असे म्हटले. जळगाव जिल्ह्यातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची दखल घेत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील , माजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, डॉक्टर अविनाश ढाकणे,जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर विलास बोडके, आदींनी देखील शुभेच्छा संदेश देऊन अभिनंदन केले.सहकार शिक्षण राजकारण सामाजिक कार्य पत्रकारिता, आरोग्य, साहित्य, क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी किशोर पाटील कुंझरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कृतीशील कार्याच्या वाटचालीबद्दल गौरव केला.शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या राज्याध्यक्ष अरुणराव जाधव यांनी विधान परिषद साठी शिक्षण क्षेत्रातून अभ्यासू सर्व प्रश्नांचा चिकित्सक अभ्यास व अमोघ वक्तृत्व असलेले नेतृत्व किशोर पाटील कुंझरकर यांची निवड व्हावी अशी मागणी केली आहे.प्रकाश घोळवे, अशोकराव महाले,सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन विकास तात्या पाटील गुढे, तात्यासाहेब सुरेश पाटील सायगाव,सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आजी-माजी आमदार, आमदार लताताई सोनवणे, आमदार निलेश लंके,राज्य समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील विशेष अभिनंदन पत्र पाठवून गौरव केला. राज्यात देशात सर्व शिक्षक काम करीत असल्याचा संदेश देण्यासाठी शिक्षक दांपत्याने केलेली ही कृती शिक्षण क्षेत्रात अनमोल मानली जात आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार राजेंद्र सपकाळे तसेच अनेक मान्यवरांनी या शिक्षक दांपत्याच्या कोरोणा काळातील शिक्षण सुरू राहण्यासाठी राबवलेल्या अनुकरणीय कृतीमुळे व राज्य शासनाने घेतलेल्या दखल मुळे जळगाव जिल्ह्याचे नाव शिक्षण क्षेत्रात उंचावल्या बद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच जळगाव जिल्ह्याच्या आपला जिल्हा आपला उपक्रम पुस्तिकेत या उपक्रमाची दखल घेण्यात आल्याचे म्हटले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भिल सुभाष भिल सुनील भील, साहेबराव महाजन रोहिदास भिल आ दि तसेच कुं झर गावच्या सर्व संस्थांच्या आजी माजी माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष दादा पाटील , महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक डॉक्टर दिनकर पाटील द गो जगताप, शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, डायट चे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे, पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद जी नांदेडे,रवींद्र भैय्या पाटील एरंडोल येथील ज्येष्ठ सामाजिक नेते शालीक भाऊ गायकवाड,संदीप भैया पाटील, आमदार राजू मामा भोळे, माजी आमदार डॉक्टर सतीश आण्णा पाटील यांनी विशेष पत्र पाठवून शिक्षण आणि सामाजिक कार्य क्षेत्रात सतत विकासात्मक कामासाठी पुढाकार घेणाऱ्या तसेच चांगुलपणा व गुणवत्ता निर्माण होण्यासाठी धडपडणार्या या शिक्षक दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे. अनुकरणीय ठरलेल्या उपक्रमाची राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतल्याने किशोर पाटील कुंझरकर यांचे एरंडोल, चाळीसगाव भडगाव पाचोरा पारोळा तालुक्यातील सरपंच संघटना पोलीस पाटील संघटना शिक्षक संघटना सर्वांनी अभिनंदन केले आहे.