सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात दुसऱ्याच वेचण्यात बोंडअळींचा वाढता प्रादुर्भाव आढळून येताच महसूल आणि कृषी विभाग खडबडून जागे झाला असून शुक्रवारी तालुक्यात बोंडअळींच्या प्रादुर्भावाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार प्रवीण पांडे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.मात्र एकीकडे महसूल विभागाकडून बोंडअळींच्या प्रादुर्भावाची तीव्रता अधिक असल्याचे सांगण्यात येत असतांना तालुका कृषी विभाग मात्र दुसऱ्याच वेचण्यांना शेतकरी फरदड घेत असल्याने बोंडअळींचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगत असल्याने पुन्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.
तालुका कृषी विभागाच्या अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या सादर केलेल्या तुटपुंज्या नुकसानीच्या अहवालामुळे सोयगाव तालुक्यातील सोयगाव आणि जरंडी हि दोन मंडळे नुकसानीतून वगळल्या गेली कृषी विभागाच्या या धक्क्यातून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा दुसऱ्याच वेचणीच्या पहिल्या टप्प्यात बोंडअळींचा प्रादुर्भाव झाल्याने अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचे पुन्हा नुकसान झाले आहे.परंतु या नुकसानीलाही तालुका कृषी विभाग फरदडमुळे प्रादुर्भाव झाल्याचे सांगत असतानान शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कि दुसर्याच वेचण्यात फरदड कसे यामुळे बोंडअळींच्या नुकसानीचेही पंचनामे अडचणीत आले आहे.