लिंबागणेश ते काटवटेवस्ती रस्त्याचा प्रश्न अखेर प्रशासकीय आधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतर मार्गी लागला –डॉ.ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― लिंबागणेश ते काटवटेवस्ति- ते अंजनवती ते घारगाव प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात यावा जेणेकरून घोलप वस्ति, वाणी वस्ति, ढवळे माळरान आदि लोकांच्या रहदारीचा प्रश्न मार्गी लागेल यासाठी दि, ३०/०६/२०२० रोजी लेखी तक्रार केली होती, त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज दि, ७ नोव्हेंबर रोजी पी, बी, जोगदंड, उपअभियंता प्रमंग्रासयो विभाग बीड, तसेच एक, वाय, गुंजाळ रा, गुंजाळ, निरीक्षक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली, डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते व सुनिल येडे, सरपंच अंजनवती, मदन मस्के,ठेकेदार,तसेच काटवटेवस्ति येथील महिला- पुरुष ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर प्रशासकीय आधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतर प्रश्न मार्गी लागला,

सविस्तर माहितीसाठी:- लिंबागणेश राज्यमार्ग ५६ ते काटवटेवस्ति- अंजनवती-घारगाव या ६:८ किलोमीटर अंदाजे किंमत ४ कोटी ८३ लाख रुपये, रस्त्याचे नियोजित अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्यात यावे यासाठी दि, ३०/०६/२०२० रोजी डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते यांनी लेखी तक्रार केली होती, त्या अनुषंगाने आज दि, ७ नोव्हेंबर रोजी पी, बी, जोगदंड, उपअभियंता प्रमंग्रासयो विभाग बीड आणि एक, वाय, गुंजाळ रा, गुंजाळ, निरीक्षक यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली, यावेळी ठेकेदार मदन मस्के एम टी कन्स्ट्रक्शन आणि काटवटेवस्ति वरील ग्रामस्थ हजर होते,
यावेळी पावसाळ्यातील घोलप वस्ति, वाणी वस्ति, ढवळे माळरान आदि ग्रामस्थांची रहदारीची सोय व्हावी यासाठी प्रस्तावित अंदाजपत्रकात लिंबागणेश ते बोरखेड मार्गावरील वरील वसत्यांचा समावेश करत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनाPMGSY-3CUPL अंतर्गत sry, no, 13 Limbaganesh-Borkhed road VR109 प्रस्तावित करण्यात आलेला आहे असे लेखी आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले, यामुळे काटवटेवस्ति- वरील ग्रामस्थांसह घोलप वस्ति, वाणी वस्ति, ढवळे माळरान आदि ग्रामस्थांचा रसत्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.