कुणीही यावे फ्युज टाकून जावे…माळेगाव-पिंप्री शिवारात महावितरणचा भोंगळा कारभार

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जरंडी ता.सोयगाव येथे शेतकऱ्याचा चिकटून शेतातच मृत्यू झाल्यावरही महावितरणच्या वीजमंडळाचे अद्यापही डोळे झाकून कारभार सुरूच असून माळेगाव-पिंप्री ता.सोयगाव शिवारात शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीजलाईन वरील रोहीत्राचा उघडा कारभार सुरु असून या रोहित्रावर कोणीही यावे आणि फ्युज टाकून जावे अशी स्थिती झालेली आहे.

माळेगाव-पिंप्री ता.सोयगाव शिवारातील एका शेतीच्या बांधावरील शेती पंपाच्या रोहीत्राचा चक्क रस्त्याला लागून उघड्यावर कारभार सुरु आहे.रस्त्याला लागूनच असलेल्या या वीज पुरवठ्याच्या रोहित्राच्या पेटीचे दरवाजेच नसल्याने उघड्या डोळ्यांनी कारभार आढळत आहे.महिनाभरापूर्वी नुकतीच एका शेतकऱ्याला तुटलेल्या केबलला चिकटून शेतातच मृत्यू झाल्याची घटना महिनाभरापूर्वीच उघडकीस आली असून सोयगाव शिवारातही चिकटून मृत्यू झाला असतांनाही महावितरणच्या वीज मंडळाचा डोळेझाक कारभार सुरु आहे.

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना धोका-

शेतीच्या बांधावरच रस्त्याला लागून असलेल्या महावितरणच्या या रोहीत्राचा उघडा कारभार असून या रस्त्यावरून वाहनधारकांची व पादचाऱ्यांची मोठी वर्दळ आहे.त्यामुळे या प्रकारचा मोठा धोका झाला असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.