सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
बाहेरून पांढराशुभ्र दिसणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसावर चक्क बोंडअळी भ्रमंती करत असल्याचे बुधवारी सोयगाव परिसरात आढळून आल्याने यंदाचा कपाशीचा हंगाम ऐन दिवाळीच्या तोंडावर हातातून निसटला आहे.पांढराशुभ्र दिसणारा कापूस वेचणीच्या लायाकाही नसल्याची स्थिती सोयगाव तालुक्यात निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा यंदा भ्रमनिरास झाला आहे.
सोयगाव तालुक्यात विविद्घ भागात हळूहळू वाढणारा बोंडअळींचा प्रादुर्भाव तालुकाभर झाला आहे,ग्रामीण भागातील कपाशीवर चक्क वेचणी लायक दिसाराना कापूस बोंडअळींनी व्याप्त झाल्याचे बुधवारी दिसून आले आहे.त्यामुळे दुसऱ्या वेचणीचा कापूस वेचणी बंद करण्यात आली असून कपाशी पिके उध्वस्त करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आढळून आला आहे.
दुसऱ्या पेरणीचीही चिंता-
कपाशी पिके यंदा लवकरच उलंगवाडी झाल्याने या बाधित कपाशीला उपटून फेकत मात्र या जागेवर दुसऱ्या कोणत्या वाणांची निवड करावी आणि निवड केली तरीही त्यासाठी तरतूद करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पदरात पैसाच नसल्याने चिंता वाढली असून कृषी विभागाकडून मात्र कोणतीही मार्गदर्शन करण्यात येत नाही त्यामुळे यंदाचा दुबार हंगामही संकटात सापडला आहे.
सोयगाव तालुक्यातील शेतकरी हातावर-
सणांचा राजा म्हणून ओळख असलेल्या दिवाळी सणाच्या तोंडावर असतांना शेतकऱ्यांची खिसे रिकामी झाली असून हातात पैसाच नसल्याने रब्बीच्या पेराण्यांसह दिवाळी सण साजरा करण्याची चिंता भेडसावत आहे.