सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी रेड्यांच्या सगरची पारंपारिक प्रथा आहे.या प्रथेची अंमलबजावणी करण्यासाठी रविवारी गलवाडा ता.सोयगाव येथे गवळी समाजाच्या वतीने म्हशींचे प्रदर्शन व रेड्यांची सगर शांततेत संपन्न केली.
परंपरेनुसार रेड्याना सजवून त्यांचेवर रंगरंगोटी करून गावातून मिरवून या रेड्यांची सगर लावण्यात आली यामध्ये प्रशिक्षित असलेल्या रेड्यांनी उपस्थितींना सलामी देवून आश्चर्यचकित केले.यावेळी अंबादास घुले व गोकुळ घुगरे यांच्या प्रशिक्षित रेड्यांनी सलामी दिली होती.लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी हि परंपरा आहे.यावेळी गोविंदा औरंगे,मलुअप्पा औरंगे,शरद औरंगे,पांडुरंग औरंगे,शिवाप्पा औरंगे,संतोष औरंगे,संभाजी घुले,विष्णू औरंगे,अनिल औरंगे,भरत औरंगे आदींनी पुढाकार घेतला होता.