परळी:आठवडा विशेष टीम― नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लेंडेवाडी, भिलेगाव, वडखेल येथे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी शरद शिनगारे, प्रकल्प सहाय्यक अतिश चाटे, प्रताप मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना हरभरा व ज्वारी बियाणे पेरण्यापूर्वी बिजप्रक्रीया करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. शेतीशाळा प्रशिक्षक राहुल मुंडे आणि गोविंद साखरे यांनी हरभरा बियाण्याला ट्रायकोडर्मा बुरशीनाशक, रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच ज्वारी बियाणाला गंधक, ऍझोटोबॅक्टर यांची बिजप्रक्रीया प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी ब्रॉड बेेड फरो (बीबीएफ) तंत्रज्ञान, गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी कापूस पिकाची फरदड घेऊ नये, तसेच पोकरा डीबीटी ऍप्लीकेशन वर योजनेचे अर्ज भरणे आणि पोकरा योजनेच्या मार्गदर्शक सूचना, परिपत्रके आणि हवामान आधारित पीक सल्ला पाहण्याकरिता https://mahapocra.gov.in वेबसाईटवर भेट देण्याचा सल्ला दिला. प्रशिक्षणाला दयानंद दौंड, महादेव दौंड, महारुद्र दौंड, नामदेव बडे, उद्धव दौंड, ईश्वर मुंडे, बालाजी शेप, केशव मुंडे, श्रीराम मुंडे, सोमनाथ शेप, मारोती मुंडे, चंद्रकांत अडसूळ, साहेबराव कडबाने गंगाधर कडबाने, माणिक कडबाने, गोविंद कडबाने, सागर विर्धे, अप्पाराव माने, केरबा कडबाने, नंदकुमार विर्धे, बाबासाहेब कडबाने, गणेश कडबाने, विष्णू चौधरी, बाबासाहेब शिंदे, अशोक कडबाने, भागवत आगलावे, शिवाजी देवकते, अशोक कोचे, गोविंद देवकते आदी शेतकरी उपस्थित होते.