परळी तालुकाबीड जिल्हा

कोरोना संकटकाळात उत्कृष्ट सेवेबद्दल एसटी चालक ज्ञानोबा आंधळे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― येथील एसटी आगरातील कर्मचारी तथ चालक ज्ञानोबा आंधळे यांनी कोरोनाच्या संकट काळात व मुंबई येथे मुंबई बेस्ट मध्येही उत्कृष्ट सेवेबद्दल राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससकडुन "कोरोना योध्दा'म्हणून सन्मानपञ देवुन आंधळे यांचा सचिन भांडे यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. या त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोरोना संक्रमन आजाराने सर्वञ थैमान घातले असुन जनजीवनही विष्कळीत झाले आहे. देशात कोरोना आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. आजच्या या भीषण (कोविड १९) परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी आपण अहोरात्र धडपडत करत आपल्या उत्कृष्ट सेवेच्या कामाची दखल घेऊन राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससच्या वतीने चालक ज्ञानोबा आंधळे यांना कोविड योध्दा पुरस्कार २०२० या सन्मानाने गौरवण्यात येत आहे. तुम्ही समाजासाठी दिलेले योगदान अतिशय कौतुकास्पद आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! असे सन्मान पत्रात नमूद केले आहे. जगातसह संपूर्ण देशात कोरोनाने आहाकार घातला आहे. अशा कठीण परिस्थितीत कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कर्तव्य बजावणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आशा कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, पत्रकार बांधवांचा आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्य करणाऱ्या एसटी चालक तथा तालुक्यातील हेळंबचे ज्ञानोबा आंधळे यांचा गौरव करण्यात आला. एसटी चालक ज्ञानोबा आंधळे यांनी एसटी बस सेवेच्या माध्यमातून त्यांनी प्रवासी यांना कोरोना विषयक जनजागृती करणे, सेनिटायझर, मास्क वापरावे असे आवाहन करणे, अनेक प्रकारच्या सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपल्या सेवा चांगल्या प्रकारे कार्य केले आहे. तसेच मुंबईच्या प्रवासी सेवेसाठी राज्यातून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. बीड विभागातून परळी आगारातून कर्मचारी पाठविले होते. यात त्यांनीही मुंबई येथे मुंबई बेस्ट सेवेत कार्यरत राहून आपले कर्तव्य बजावत आहेत.18 दिवसात या कोरोना विषयक काळजी घेत आपले कार्या बजावले आहे. आपली भूमिका प्रामाणिकपणे व जबाबदारी पार पाडली आहे. याच उदात्त भावनेतून सामाजीक कार्य ऊल्लेखनिय आहे. या कार्याची ईतरांनीही प्रेरणा घेणे जरुरीचे आहे.कोरोणाविषयक जनजागृती,विविध माध्यमातुन मदत,प्रशासनाशी समन्वय या बाबींची दखल घेवुन राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससकडुन "कोरोना योध्दा'म्हणून सन्मानपञ देवुन सचिन भांडे यांचे हस्ते चालक आंधळे यांना गौरविण्यात आले. कोरोना योध्दा म्हणून चालक ज्ञानोबा आंधळे यांचा गौरव केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.