राजकिशोर मोदी मित्रमंडळाचे सामाजिक उपक्रम , वृक्षारोपण , गरजूंना बस सवलत कार्ड ,ब्लँकेट ,रूग्णांना फळ वाटप

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी ही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्वाराती रूग्णालयात फळ वाटप,गरजुंना बस सवलत कार्ड तसेच थंडी पासून बचाव करणा-या चादरीचे (ब्लँकेट) वाटप,गवळीपुरा कब्रस्तान या ठिकाणी वृक्षारोपण करून सिमेंट खुर्च्या देण्यात आल्या.योगेश्‍वरी मंदिरात महाआरती करून संघर्षभूमी (चनई) येथे तथागत गौतम बुद्ध यांच्यासह महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करणे तसेच चनई येथील हजरत ख्वाजा मसुद किरमाणी दर्गाह येथे चादर चढवणे आदी उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मित्रमंडळाच्या वतीने विधायक व सामाजिक असे लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.या वर्षीही मित्रमंडळाच्या वतीने अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.19 नोव्हेंबर हा राजकिशोर मोदी यांचा वाढदिवस आहे.या दिवशी राजकिशोर मोदी यांना निरोगी दिर्घायुष्य लाभावे याकरिता गुरूवारी सकाळी 9.30 वाजता श्री योगेश्‍वरी देवी मंदिरात महाआरती करण्यात आली.सकाळी 10 वाजता चनई येथील सर्वधर्मियांसाठी आदराचे स्थान असणा-या हजरत ख्वाजा मसुद किरमाणी दर्गाह येथे चादर चढविण्यात आले.त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता संघर्षभूमी येथे तथागत गौतम बुद्ध यांच्यासह महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.तसेच 10.30 वाजता स्वाराती रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.या सोबतच सज्जन गाठाळ यांचेकडून अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील महिला-पुरूष कामगारांना मिठाई वाटप करण्यात आली.मित्रमंडळाचे कार्यकर्ते अजिम जरगर यांच्या वतीने गरजू नागरिकांना बस सवलत कार्डचे वाटप करण्यात आले.तसेच गवळीपुरा मिञमंडळाकडून गवळीपुरा कब्रस्तान या ठिकाणी वृक्षारोपण करून सिमेंट खुर्च्या देण्यात आल्या.या सोबतच सायंकाळी शहरातील सार्वजनिक ठिकाणी असणारे निराधार व गरजू व्यक्तींना थंडी पासुन बचाव करणा-या चादरीचे (ब्लँकेट) वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मित्रमंडळाकडून देण्यात आली आहे.बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी राबविण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी सामाजिक उपक्रमांचे आयोजना करिता अंबाजोगाई शहराच्या नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी,महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके, मित्रमंडळाचे अध्यक्ष व श्री योगेश्‍वरी नागरी पतसंस्थेचे चेअरमन माणिक वडवणकर, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी,संचालक प्रा.वसंतराव चव्हाण, रिकबचंद सोळंकी, नगरसेवक मनोजभाऊ लखेरा,काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक सुनिल व्यवहारे, नगरसेवक आसेफोद्दीन खतीब, नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक धम्मपाल सरवदे,बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,किशोर परदेशी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,बीड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कचरूलाल सारडा,अॅड.अनिल लोमटे,दत्ताञय दमकोंडवार,राणा चव्हाण,अशोक जेधे, पुरूषोत्तम चोकडा,भुषण मोदी,अरूणराव काळे,हाजी मेहमुद दादामियाँ,सुनिल वाघाळकर,गणेश मसने,खालेद चाऊस, सज्जन गाठाळ, अशोक देवकर, विलास जाधव, रणजित पवार,अकबर पठाण,विजय रापतवार,दिनेश घोडके,बबन पाणकोळी,अजय रापतवार,सुधाकर टेकाळे,सचिन जाधव, शेख खलील,अतुल कसबे,अमजद पठाण, भारत जोगदंड,शेख मुक्तार,जावेद गवळी, महेबूब गवळी,माऊली वैद्य,अजिम जरगर, सुशील जोशी,मतीन जरगर,चेतन मोदी, शुभम मोदी,जुनैद सिद्दीकी,बद्रीनाथ सोमवंशी,गालेबखाँ पठाण,अमोल मिसाळ,प्रताप देवकर, शेख अकबर,सलीम गवळी,योगेश चव्हाण, विजय कोंबडे, चंद्रकांत महामुनी, सय्यद अमजद, सी.व्ही.गायकवाड, आनंद टाकळकर, बालासाहेब इंगळे, राजेश कांबळे,श्रीकांत जोशी आदींसहीत मोदी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन पुढाकार घेतला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.