सातगाव तालुका पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथील हनुमान (मारूती) मंदिर अनेक वर्षापूर्वी बांधलेले असून, आता ते जीर्ण झाल्याने, गावातील मारुती मंदिर पंच कमिटीने त्याच ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यासाठी परमपूज्य चिदानंद स्वामी- ज्ञानेश्वर माऊली आणि प्रकाश बाबुलाल परदेशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
सातगाव डोंगरी हे गाव एक वैशिष्ट्यपूर्ण असून, येथून खानदेश व मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले चार किलोमीटरवर अजिंठा पर्वत रांगेत जागृत जोगेश्वरी देवी व इंद्रगढी देवीचे भव्य मंदिरे आहेत. सातगाव ग्रामस्थावर या देवींची मोठी कृपा असल्याची श्रद्धा ग्रामस्थांची आहे. अनेक वर्षापूर्वी सातगाव डोंगरीत मारुती मंदिराची उभारणी झालेली असून, आता मात्र ते जीर्णावस्थेत आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मारुती मंदिर पंच कमिटीने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ७१ फूट उंची असलेल्या कळस रुपी मंदिर निर्माण साठी नुकतेच परमपूज्य चिदानंद स्वामी- ज्ञानेश्वर माऊली व प्रकाश बाबुलाल परदेशी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पूर्ण करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी नोकरी अथवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक व्यक्ती या कार्यक्रमास हजर होत्या. बाहेरगावावरूनही अनेक श्रद्धाळू यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. आर. वाघ यांनी तर सूत्रसंचालन उत्तमराव मनगटे पाटील यांनी केले.
यावेळी पंचकमिटी अध्यक्ष विठ्ठल पवार, उपाध्यक्ष विक्रम वाघ, महादू बोरसे, त्र्यंबक पवार, लक्ष्मण अश्रू पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र बोरसे, प्रल्हाद शेळके, भागवत पाटील, प्रल्हाद वाघ, शेखर पाटील, जगदीश गरुड, अण्णा मराठे, शंकर बोरसे, गणेश मराठे, अशोक पाटील, भगवान मंदाडे, बाबूलाल मनगटे, सुनील मराठे, गजानन लाधे, वाल्मीक पाटील, गजानन वाघ, रमेश पाटील, सतीश लोहार, विजय चौधरी, सुरेश गायकवाड, आबा पाटील, गोकुळ परदेशी, सुधीर बच्छे, जनार्दन मुठ्ठे, कैलास मराठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.