सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जरंडी परिसरात जरंडी,निंबायती,बहुलखेडा आदी परिसरात गुरुवारी रात्री मुसळधार अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने रब्बीच्या कोवळ्या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने जरंडी मंडळात निसर्गाचा फटका सुरूच आहे.
जरंडीसह निंबायती,बहुलखेडा,या भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात हजेरी लावली यामध्ये रब्बी पिकांच्या कोवळ्या अंकुरांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.अर्ध्या तासाच्या पावसाने जरंडीला धुमाकूळ घातला होता.अवकाळी पावसाचा जरंडीला अधिक जोर होता.