बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

बीड जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतूक सेवेतून सूट दया – खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली परिवहन मंत्र्यांकडे मागणी

बीड.दि.२०:ऋषिकेश विघ्ने बीड जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी मुंबई येथे बेस्ट बसची वाहतूक सेवा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाठवण्यात येत असल्याची माहिती समजताच खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना बेस्ट बसच्या वाहतूक सेवेतून सूट द्यावी आणि मुंबईत बेस्टमध्ये कर्तव्य बजावण्यास मनाई करावी अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी बेस्टच्या वाहतूक सेवेचे कर्तव्य दिल्यामुळे एस.टी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.यासंदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या अडचणी मांडल्या आहेत.बीड जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या चारशे कर्मचाऱ्यांना आतापर्यंत मुंबईला बेस्टमध्ये वाहतूक सेवेसाठी पाठवण्यात आले होते.यापैकी १४६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.कोरोनाची लागण झालेल्या एस.टी कर्मचाऱ्यांना शासन स्तरावर औषधोपचार,आर्थिक सहाय्य व इतर शासकीय सुविधा त्वरित पुरविण्यात याव्यात अशी देखील मागणी खा.प्रितमताई मुंडे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

तसेच मुंबईला बेस्टच्या वाहतुकीसाठी पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पगारी रजा ग्राह्य करण्यात यावी आणि एस.टी च्या कर्मचाऱ्यांना मुंबईत कर्तव्य बजावण्यास मनाई करून कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना परत मुंबईला कर्तव्य मनाई करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडल्याबद्दल एस.टी कर्मचाऱ्यांमधून खा.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले जात आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.