आष्टी:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात धवलक्रांती घडवणार्या आष्टी तालुका दुध संघात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय दुग्ध विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबई (महानंद) मार्फत आधुनिक पद्धतीचे दुध गुणप्रत व भेसळ तपासणी यंत्र मिळाले असून या आधुनिक प्रयोगशाळा व मशीन चे उद्घाटन आमदार सुरेश धस यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
स्वच्छ व निर्भळ दुधाचा पुरवठा करून दूध धंद्यात प्रगती कशी साधता येईल याचा शेतकऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे पारंपरिक पद्धतीने दूध व्यवसाय न करता आधुनिक पद्धतीने मुक्त गोठा किंवा सकस पशुखाद्याचे नियोजन करणे गरजेचे आहे योगायोगाने यावर्षी संपूर्ण आष्टी तालुक्यात निसर्गराजा ने साथ देत सर्व तलाव भरले आहेत त्यामुळे दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत. तसेच यापुढे भविष्यात दोन वेळा (सकाळ,संध्याकाळ) दूध संकलन करणे ही काळाची गरज असून त्यामुळे दूध दरांमध्ये भाववाढ नक्कीच मिळू शकते यासाठी सर्व शेतकरी व चेअरमन यांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार धस यांनी केले.
दूध तपासणीसाठी आष्टी तालुका दूध संघाने आधुनिक अशी प्रयोगशाळा तयार केली असून तयार केली असून या प्रयोगशाळेत दुध तपासणी करण्याचे आधुनिक पद्धतीचे मशीन बसविण्यात आले आहे या मशीनमध्ये जवळपास पस्तीस प्रकारच्या दुधाच्या तपासण्या अवघ्या एक मिनिटात होत आहेत त्यामध्ये फॅट डिग्री प्रोटीन एस एन एस किंवा अन्य भेसळ अशा तपासण्या होणार आहेत यापुढे शेतकऱ्यांनी निर्भळ दुधाचा पुरवठा करण्याचे आवाहन आ.धस यांनी केले.याप्रसंगी दूध संघाचे चेअरमन संजय गाढवे व्हाईस चेअरमन आत्माराम फुंदे कार्यकारी संचालक मच्छिंद्र धनवडे,दिनकर दानी संचालक अशोक गर्जे ,पोपट धुमाळ, शिवाजी घोलप, कल्याण काकडे पोपट आजबे ,अशोक भवर, रंगा गाडे, चेअरमन भरत जाधव ,शांतिनाथ भोसले, गोकुळ कोकणे ,सुनील काकडे ,डॉक्टर संतोष शेळके ,भरत सुळे, गणेश मोकाशे, रघुनाथ कर्डिले ,मोहन तात्या झाम्बरे सह संस्था प्रतिनिधी व चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.