जनसंग्रामच्या पाठपुराव्याला यश ,बीएचआर ठेवीदारांना ऐन दिवाळीत मिळाला दिलासा

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
जळगाव येथील बुडीत म्हणून अवसायनात निघालेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांना ऐन दिवाळीत दिलासा मिळाला आहे.जनसंग्राम ठेवीदार समन्वय समितीच्या पाठपुराव्यामुळे हार्डशिप प्रकरणे दाखल असलेल्या ११७ ठेवीदारांना अंशतः रकमेचा परतावा मिळाल्याने संस्थेचे अवसायकांच्या कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे.या मध्ये जिल्ह्यातील बीडसह अंबाजोगाई,परळी,माजलगाव आदी शाखेतील ठेवीदारांचा समावेश आहे.

जळगाव येथील बीएचआर संस्थेच्या संचालकांनी केलेल्या बेनामी ठेवींच्या अनियमिततेमुळे २०१५ पासून अवसायनात आलेल्या या संस्थेच्या कर्जवसुलीतून व मालमत्ता विक्रीतून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांना “हार्डशिप” प्रकरणे स्विकारून ठेवींचा परतावा देण्यात यावा अशी मागणी घेऊन जनसंग्राम ठेवीदार संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी विविध पातळ्यांवर लढा चालवला होता.त्यानुसार राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे संघटनेने केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेऊन संघटनेच्या तक्रारदार सभासदांना वसुलीच्या प्रमाणात ठेवींचा परतावा करण्याचे आदेश लोकायुक्त यांनी दिलेले आहेत.याला अनुसरून संस्थेच्या अवसायकांनी कोरोना परिस्थितीमुळे कर्जवसुली ठप्प असतांना सुद्धा जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या वतीने सादर हार्डशिप प्रकरणातील १७१ ठेवीदारांना त्यांची पैशांची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन सुमारे १ कोटी ३४ लाखांची रक्कम ऐन दिवाळीत त्यांच्या खात्यावर जमा केली.ज्या गरजू ठेवीदारांना परतावा मिळाला त्यांनी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या कामाबद्दल व जनसंग्राम संघटनेच्या पाठपुराव्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

२ लाखांपुढील गुंतवणूकदारांना आवाहन-

===================
जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे संस्थेच्या तत्कालीन संचालकांवर राज्यातील ५९ ठिकाणी एमपीआयडी कायद्याने गुन्हे दाखल झाल्याने संचालकांना अटक होऊन संस्थेच्या मालमत्ता विक्री व कर्जवसुलीतून गुन्हे दाखल केलेल्या व सहतक्रारदार ठेवीदारांना मुदतीत ठेव रक्कम परत देणे अधिनियमानुसार बंधनकारक असल्याने संघटनेकडून “हार्डशिप” प्रकरणे तयार करून ठेवीदारांना कर्जवसुलीच्या प्रमाणात टप्प्याटप्प्याने ठेव रक्कम परत मिळण्यासाठी पाठपुरावा केला जातो.जनसंग्राम ठेवीदार संघटनेचे सभासद असलेल्या दोन लाखांच्या पुढील गुंतवणूकदारांनी ठेव रक्कम परत मिळावी म्हणून आपापले मूळ पावत्यांसह हार्डशिप प्रकरण दाखल करावे किंवा अधिक माहितीसाठी (7620093937) या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन विवेक ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.