अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बर्दापूर येथील महामानव पुतळा विटंबना घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी करत युवा आंदोलनच्या वतीने सोमवार,दिनांक 23 नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चाने बर्दापूर दणाणले.
आमचा लढा न्यायासाठी,बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून युवा आंदोलनची सर्वदूर ओळख आहे.संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांच्या नेतृत्वाखाली बर्दापूर येथे सोमवारी आक्रोश मोर्चा काढून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन बर्दापूर (ता. अंबाजोगाई,जि.बीड) यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात बर्दापूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना प्रकरणाची सी.बी.आय.चौकशी करावी अशी मागणी करून नमूद केले आहे की,मौजे बर्दापूर,ता. अंबाजोगाई (जि.बीड) येथे दिनांक २८/१०/२०२० रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोड-फोड करून विटंबना करण्यात आली.हि घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे अशा घटना महाराष्ट्रामध्ये रोज कुठे ना कुठे घडत आहेत.या घडणा-या घटनेला आळा बसवायचा असेल तर स्थानिक पातळीवरील प्रशासकीय मंडळाला जबाबदार धरून त्यांच्यावर कार्यवाही करावी.बर्दापूर येथील घटनेची सी.बी.आय. मार्फत चौकशी करावी जेणे करून त्या घटनेतील खरा सुञधार समोर येईल.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय महापुरूष आहेत.त्यांचा अवमान म्हणजे देशाचा अपमान असे कृत्य करणा-यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा.बर्दापूर येथील ग्रामपंचायतने जाणून बुजुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष केले.म्हणून वरील घटना घडली.त्यामुळे त्या ग्रामपंचायत स्थानिक शासन व प्रशासन यांना जबाबदार धरून त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा.सदर घटनेतील अटक आरोपीची नार्को टेस्ट करा.म्हणजे खरा आरोपी समोर येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम तात्काळ चालु करा.जेणे करून ६ डिसेंबर 2020 रोजी त्या ठिकाणी अनुयायांना अभिवादन करता येईल.सदरील मागण्या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ मान्य कराव्यात हि विनंती.अन्यथा याप्रश्नी संघटनेच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येईल व त्यास शासन- प्रशासन जबाबदार असेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.युवा आंदोलनच्या आक्रोश आंदोलनात संस्थापक अध्यक्ष अशोक पालके,धिमंत राष्ट्रपाल,महेश जोगदंड,शरद झरे, भाऊ कोरडे,दिलीप पालके,राम जोगदंड, अविनाश हजारे, अमोल जोगदंड, तात्याराव जोगदंड, भगिरथ कोरडे,प्रशांत दहिफळे,लक्ष्मीकांत शिंदे,प्रेम गंडले, परमेश्वर जोगदंड, तानाजी जोगदंड, धैर्यशील गंडले,बाबा गायकवाड,राहुल गंडले,अमोल व्ही.जोगदंड,अमोल एल.जोगदंड,अविनाश एन.जोगदंड,हरीहर जोगदंड,लक्ष्मण गंडले,लहु जोगदंड, महादेव गंडले,दिलीप कोरडे,संभाजी कोरडे, अमोल कोरडे आदींचा समावेश होता.